राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सोमवारी लोकार्पण

 राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सोमवारी लोकार्पण 

 


 

   लातूर/प्रतिनिधी:लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने नांदेड रस्त्यावर शाहू महाराज चौकात उभारण्यात आलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोमवार दि.२६ जून रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे.

यावेळी मान्यवर लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहेअशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी दिली.

   मनपाच्या वतीने शाहू महाराज चौकात पुतळा उभारणीचे काम पूर्ण झालेले आहे.या पुतळ्याचे लोकार्पण लवकर करावे,अशी मागणी शहरातील नागरिकांकडून वारंवार केली जात होती.या मागणीची दखल घेत सोमवारी लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास खा.सुधाकर शृंगारेधाराशिवचे खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आ.विक्रम काळे,आ.सतिश चव्हाणआ.सुरेश धस,आ.रमेश कराडआ.अमित देशमुखआ.संभाजी पाटील निलंगेकर,आ.बाबासाहेब पाटील,आ.संजय बनसोडेआ.धीरज देशमुख,आ.अभिमन्यू पवारजिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल या मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.सोमवारी सकाळी ८ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावेअसे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने