विविध उपक्रम राबवून ज्ञानदानाचे कार्यकरणारी जिपप्राशाळा

विविध उपक्रम राबवून ज्ञानदानाचे कार्यकरणारी जिपप्राशाळा 
 आलमला :- औसा तालुक्यातील आलमला केंद्रांतर्गत असलेली प्रा.शा. कुलकर्णी तांडा ही शाळा उपक्रमशील शाळा म्हणून प्रगतीपथावर आली आहे. या शाळेमध्ये बाला उपक्रमांतर्गत सर्व उपक्रम दैनंदिन शाळेमध्ये घेतले जातात, येथे पहिली ते चौथीचे वर्ग असून एकूण शाळेचा पट 30 आहे.शाळेमध्ये सुंदर परसबाग,  स्वच्छतागृहे, विविध फुलझाडे शाळेच्या बोलक्या भिंतीने रंगवलेले कुंपण, शाळेतील वर्गातील सर्वच भिंती बोलक्या असून सुंदर व चित्रमय अक्षर ज्ञान केलेले आहे. मुलांना दुपारच्या खाऊ साठी सुसज्ज असे किचन शेड असून तेथे नियमित प्रमाणे सकस पोषण आहार दिला जातो यासाठी सौ. कमलताई चव्हाण कार्यरत आहेत. या शाळेचे मुख्याध्यापक संजय बिरादार व सहशिक्षिका सौ.सुनिता राठोड असे उपक्रम राबवण्यासाठी नेहमीच कार्यशील असतात व शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतात,  यासाठी शालेय समितीचे अध्यक्ष
अरुण चव्हाण, केंद्रीय प्रा.शा.आलमला येथील केंद्रीय मुख्याध्यापक वामन राठोड, केंद्रप्रमुख प्रशांत शिंदे यांचे मार्गदर्शन नेहमी असते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने