माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा

माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा
औसा प्रतिनिधी -सकाळी आठ वाजता ग्रामदैवत मुक्तेश्वर मंदिरात महाअभिषेक व महाआरती करून त्यानंतर औसा येथील हनुमान मंदिरात सर्वरोग निदान शिबिर नेत्र चिकित्सा शिबिर व रक्तदान शिबिर घेण्यात आले तसेच येथील मूकबधिर व मतिमंद शाळेत विद्यार्थ्यांना आसन पट्ट्या भेट देऊन दुपारचे भोजन देण्यात आले. अशा विविध कार्यक्रमाने पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस औसा तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संपूर्ण तालुक्या मधे शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनांपासून आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसापर्यंत ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील एकूण 64 गावांमध्ये शिवसेना आरोग्य सेवा देत शिवसेनेचा मूळ धर्म असणारा 80 टक्के समाजसेवा व 20 टक्के राजकारण या पद्धतीने औसा शिवसेना कार्यरत आहे.सर्वरोग निदान शिबिर नेत्र चिकित्सा शिबीर व रक्तदान शिबिराच्या माध्यमातून हजारो रुग्णांना मोफत सेवा देण्याचे काम केले आहे व यापुढेही वंदनीय हिंदुरुदय सम्राट सरसेनापती समान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे  यांच्या प्रेरणेतून लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने माजी खासदार चंद्रकांत खैरे,  उपनेते तथा मराठवाडा सचिव  विश्वनाथजी नेरुळकर ,  लातूर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आ. रोहिदास चव्हाण यांच्या सूचनेवरून  जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने  यांच्या कुशल नेतृत्वात शिवसेना माजी आ. दिनकरराव माने  यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे यांच्या नेतृत्वात संपूर्ण तालुक्यातील 105 गावांमध्ये यापुढे हा उपक्रम राबवून शिवसेनेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा काम यापुढेही अविरत चालू असणार आहे. यावेळी उपस्थित शिवसेना  तालुका समन्वयक संतोष सूर्यवंशी सहसमन्वयक महादेव साळुंखे पंचायत समिती माजी सदस्य संदिपान शेळके उपशहर प्रमुख सचिन पवार संपर्क दूत किरण कदम तालुका अल्पसंख्यांक सेल चे सलीम पटेल सुधाकर मुगळे युवा सेना माझे शहर प्रमुख गणेश गायकवाड माजी प. स सदस्य विनोद भैय्या माने, डॉ. रवींद्र चव्हाण साहेब त्यांची पूर्ण टीम व पाटिल ब्लड बँक लातूर चे डॉ. नयन पाटिल व त्यांची पूर्ण टीम तसेच शिवसेना औसा तालुक्यातील शिवसैनिक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने