लातूर काॅलेज आॅफ एम फार्मसीत (फार्माकोग्नोसी )ला मान्यता

लातूर काॅलेज आॅफ एम फार्मसीत (फार्माकोग्नोसी )ला मान्यता 
  औसा (प्रतिनिधी )  श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ  एम फार्मसी (फार्माकोग्नोसी ) नवीन कोर्स ला मान्यता मिळाली .  फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया दिल्ली व तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई यांनी  मान्यता दिली आहे .  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड अंतर्गत हा चालणारा कोर्स आहे .डी आणि बी फार्मसी पूर्ण होऊन  झालेल्या विद्यार्थ्यां च्या स्पेशेलाजेशनसाठी हा विषय आहे  अशी माहिती लातूर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ श्यामलीला बावगे (जेवळे ) यांनी दिली . 
             त्याबद्दल  संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर अप्पा बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे ,कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे  संचालक नंदकिशोर बावगे , लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ,हासेगाव , राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था  , गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल  , लातूर कॉलेज ऑफ सायन्स,  लातूर ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी,लातूर  , या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विध्यार्थी यांनी  येथील प्राचार्य आणि प्राद्यापक वर्गाचे  अभिनंदन करून महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने