प्रा. सुभाष इंदलकर यांना पीएच.डी.पदवी प्रदान

प्रा. सुभाष इंदलकर यांना पीएच.डी.पदवी प्रदान

औसा : येथील श्री.कुमारस्वामी महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागात कार्यरत असलेले प्रा.सुभाष इंदलकर यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली.त्यांनी डॉ.प्रवीण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली " कुसुमकुमार के समग्र साहित्य का समीक्षात्मक अध्ययन " या विषयावर शोध प्रबंध विद्यापीठात सादर केला होता.
     या यशाबद्दल श्री.महंतस्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर,सचिव गिरीश पाटील,प्राचार्य डॉ.महेश्वर बेटकर,उपप्राचार्य डॉ.सुभाष मिसाळ,ग्रंथपाल प्रा.अंबादास खिलारे,कनिष्ठ विभागाचे समन्वयक प्रा.चंद्रकांत पाटील,डॉ.सुनील पुरी,डॉ.कर्मवीर कदम,डॉ.जांबुवंतराव कदम,डॉ.विनायक वाघमारे,डॉ.दयानंद पटवारी,डॉ.गणेश मनगिरे,प्रा.प्रसाद कदम,डॉ.किरण चौधरी,प्रा.बालाजी कोकणे,प्रा.मधुकर कदम,प्रा.शिवराज मिटकरी,प्रा.रमाकांत साबदे,प्रा.पांडुरंग घुले,प्रा.राजकुमार पवार,डॉ.बळीराम लहाने,प्रा.अश्विन सुळकेकर,प्रा.अर्चना शिंदे यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने