रामनाथ विद्यालयात आप्पासाहेब समशेट्टे यांना निरोप

 रामनाथ विद्यालयात आप्पासाहेब समशेट्टे यांना निरोप
आलमला :- श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला येथे दिनांक 31 जुलै 2023 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात विद्यालयातील सेवक कर्मचारी श्री आप्पासाहेब सखाराम समशेट्टे यांचा सेवापुर्ती निमित्त निरोप समारंभ व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक प्राध्यापक जी.एम.धाराशिवे सर हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट उमाशंकर पाटील, संस्थेचे सचिव श्री प्रभाकर कापसे, कोषाध्यक्ष श्री चनबसप्पा निलंगेकर, संचालक मन्मथप्पा धाराशिवे, शंकरराव धाराशिवे, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस. के.मुळे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील, हे उपस्थित होते. सर्वप्रथम संस्थेच्या वतीने व नंतर कर्मचाऱ्यांच्या वतीने श्री अप्पासाहेब समशेट्टे यांचा सपत्नीक भर पेहराव आहेर, शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सचिव प्रभाकर कापसे, मुळे सर, सौ अनिता पाटील व माधव गंगापुरे यांनी आपल्या आप्पा समशेट्टे विषयीच्या भावना व्यक्त करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी त्यांचे नातलग सर्व मुली, जावई, सर्व मित्र परिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक मुळे पी. के. यांनी मांडले, सूत्रसंचालन भास्कर सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.भिंगोले सर यांनी मांडले. तर अध्यक्षीय समारोप संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्रा. जी.एम.धाराशिवे यांनी करून आप्पासाहेबांना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील पर्यवेक्षक श्री पाटील पी.सी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने