ज्ञानप्रकाशच्या मुलांची सेवालयास भेट

 ज्ञानप्रकाशच्या मुलांची सेवालयास भेट


 हसेगाव-ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पात मुलांचे वर्गातील शिकण्यासोबतच त्यांच्यावर वेगवेगळ्या उपक्रमातून तसेच  क्षेत्रभेटीतून अभ्यासू व समाजमन घडविण्याचा संस्कार केला जातो.
प्रकल्पातील मुले अगदी बालगटापासून व 10 वी वर्गापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्रभेटीस जातात.त्यात शेती, कारखाना, उद्योग , विविध सामाजिक संस्था  इ  ठिकाणी भेटीचे नियोजन केले जाते.
 आज अशीच इयत्ता 10 वी वर्गातील मुलांची हसेगाव येथील सेवालयास क्षेत्रभेट झाली. वी बापटले सरांनी उभं केलेलं , एच.आय.व्ही बाधीत मुलांकरिता सेवावृत्तीने केलेलं काम मुलांना जवळून अनुभवात व पाहता आले .इयत्ता 10 वी तील 70 मुलं  आणि शिक्षकांनी सेवालय परिसरात 1 तास श्रमदान केले. 15 एकर परिसरातील तेथील मुलांच्या व श्री.बापटले सरांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यातून झालेलं नंदनवन पाहून मुलांना खूप छान वाटलं. सामूहिक श्रमपरिहारांतर श्री.रवी बापटले सरांशी मुलांचा संवाद झाला. त्यानंतर मुलांनी स्वयंस्फूर्तीने जमा केलेली रक्कम भावनिक अनुबंधाच्या स्वरूपात बापटले सरांकडे सुपूर्द केली.या क्षेत्रभेटीसोबत मुख्याध्यापिका नरहरे मॅडम, पर्यवेक्षक अशोक सर, पाटील सर, शिंदे सर व पाठक मॅडम तसेच प्रकाश दादा होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने