सेवापूर्ती व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न

 सेवापूर्ती व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न

औसा/ प्रतिनिधी -ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था संचलित विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जवळगा पोमादेवी शाळेत आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून शाळेतील पर्यवेक्षक श्री माधवराव सागावे यांचा ३२ वर्षांच्या सेवापूर्तीनिमित्त सत्कार करून अभिनंदन केले. 
यावेळी दहावीच्या परीक्षेत शाळेत प्रथम आलेला कु. संचित इंद्रजीत निकम, द्वितीय आलेली कु. प्रणिता प्रवीण गाडीवाले, तृतीय आलेली कु. सृष्टी उत्तम निकम, उत्कृष्ट टक्केवारी मिळवलेले कु. साक्षी बालाजी सूर्यवंशी, कु. शुभम गणेश काकडे, कु. गायत्री बलभीम शिंदे, कु. सृष्टी मनोहर येणेगुरे, कु. प्रीती वैजनाथ पाटील, बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेली कु. भक्ती भगवान मंगरुळे, द्वितीय आलेली कु. पूजा दिगंबर जंगाले, कला शाखेतून प्रथम आलेली कु. विशाखा प्रताप मोरे, सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेला कु. पृथ्वीराज संभाजी मोरे तसेच स्कॉलरशिपसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी कु. सायली राजकुमार चव्हाण, कु. संध्या प्रकाश चव्हाण व कु. श्रावणी रामलिंग स्वामी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक आ.अभिमन्यू पवार , कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण फडणीस, प्रमुख पाहुणे डॉ. हनुमंत किनीकर, संस्थेचे अध्यक्ष भागवतराव काकडे, उपाध्यक्ष शिवाजीराव राजेगावे, सचिव डॉ.अनिल फडणीस, सहसचिव नंदकिशोर माळी, प्राचार्य व्यंकट किनीकर, संग्राम मोरे , बाजार समिती सभापती  शेखर तात्या सोनवणे, प्रा.भीमाशंकर राचट्टे,प्रकश काकडे, काकासाहेब मोरे, प्रा. सुधीर पोतदार,संजय कुलकर्णी,
विठ्ठल काकडे,पांडुरंग माळी,  गोविंद मुडबे,  सचिन अनसरवाडे,  निलेश काकडे,  कुमार आबा पाटील,  वसंतराव पाटील,  अमोल पाटील, वसंतराव गाडीवाले, दादासाहेब काकडे,  व्यंकटनाना माळी,  नितीन कवठाळे,गोपाळ शिंदे, शाळेतील सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी बांधव, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने