2030 मध्ये महासत्ता बणून 21 व्या शतकात भारत जगाचे नेतृत्त्व करेल - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर-76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाने जगाच्या तुलनेत चौफेर प्रगती केलेली आहे. सरंक्षण, शिक्षण, अर्थकारण यासह देशाला जागतिक पातळीवर स्थान मिळवून देण्यासाठी व राष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांनी निष्ठेने कार्य केलेले आहे. देशातील शेतकरी आणि कृषी क्षेत्र समृध्द आणि संप्पन्न व्हावे यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील आहे. हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपध्दतीवरून दिसून येत आहे. त्यामुळे भारताला आज जी-20 चे अध्यक्षपद मिळालेले आहे. या त्यांच्या कार्यकर्तत्वाबद्दल 13 राष्ट्रांनी त्यांचा सर्वोच्च पदक देऊन गौरव केलेला आहे. यामध्ये तीन मुस्लीम राष्ट्रांचाही समावेश आहे. देशाच्या या जागतिक स्पर्धेतील आर्थिक प्रगतीमुळे देश जगात दहाव्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर आलेला आहे. भविष्यात तो अमेरिका चीन नंतर तिसर्या क्रमांकावर येऊन देशाच्या या चौफेर प्रगतीमुळे 2030 मध्ये महासत्ता बणून भारत पूर्ण जगाचे नेतृत्त्व करेल, असे प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.यावेळी ते जेएसपीएम संचलित अराईज इंटरनॅशलन स्कूल भोसरी येथे आयोजित 76 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला प्राचार्य जितेंद्र खैरनार, श्रीमान भूमरे, अग्रवाल, पवार, मकरंद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, हर घर तिरंगा या उपक्रमातून देशप्रेम जागृत करण्याचे काम केले जात आहे. तिरंगा हे त्याग, समर्पण, अखंडता व भक्ती-शक्तीचे प्रतिक आहे. 200 वर्ष इग्रजांनी देशावर राज्य केले. 1857 ते 1947 पर्यंत ब्रिटीशांची सत्ता होती. शेवटचे गव्हर्नर म्हणून माऊंट बेटन यांनी काम पाहिले. या इंग्रजी सत्तेच्या विरोधात टिपू सुलतान, झाशीची राणी, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडीत जवाहरलाल नेहरू, श्यामप्रकाश मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह इतर महात्म्यांनी लढा देऊन स्वातंत्र्य मिळवण्याचे काम केले व सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशाची प्रगती साधण्याचे काम सुरू आहे. देशामध्ये 37 वर्षामध्ये सीबीसीएस शिक्षण पध्दती लागू करून वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते ध्वजारोहन करून व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जितेंद्र खैरनार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार भूषण नायर व मृदुला जगताप यांनी केले. यावेळी या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचार्यांसह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
तेजस्वी तरूण घडविण्याचे काम जेएसपीएम संस्थेतून होते
जेएसपीएम संस्थेअंतर्गत येणार्या 37 युनिटच्या माध्यमातून अध्यात्म, विज्ञान व व्यावसायीकता या त्रिसूत्रीच्या आधारे तेजस्वी तरूण घडविण्याचे काम गेल्या 40 वर्षापासून सुरू आहे. या संस्थेतील अनेक विद्यार्थीी डॉक्टर, इंजिनियर व अधिकारी पदावर कार्यरत आहेत. याचा संस्थेला सार्थ अभिमान आहे. यापुढील कालावधीतही संस्थेच्या माध्यमातून तेजस्वी तरूण घडविण्याचे काम कायम सुरू आहे. तोच आदर्श कायम ठेवून जेएसपीएम संस्थेअंतर्गत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी यशस्वी वाटचाल करावी असे प्रतिपादन माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
------------------------------
टिप्पणी पोस्ट करा