लातूर जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळात 25 टक्के अग्रीम पिक विमा लागू करा मनसेने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 लातूर जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळात 25 टक्के अग्रीम पिक विमा लागू करा मनसेने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 


 लातूर - जिल्ह्यात 27 जुलैपासून म्हणजे जवळपास एक महिन्यापासून पावसाचा खंड असतानाही स्कायमेट कंपनीच्या अनेक ठिकाणी बंद असलेल्या पर्जन्यमापकाचा आधार घेऊन खोटी पावसाची आकडेवारी दाखवून जिल्ह्यात थोडक्याच महसूल मंडळात 25 %अग्रीम पीक विमा लागू करण्याचा विमा कंपनीचा घाट हाणून पाडून संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात 25 %अग्रीम पिक विमा लागू अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लातूर जिल्हा भरती आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे.

या चालू वर्षी जवळपास एक महिना लातूर जिल्ह्यात 27 जुलैपासून पावसाचा खंड पडला आहे, त्यामुळे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरखाली संपूर्ण जिल्ह्यात 25% अग्री विमा लागू होऊ शकतो कारण या कंपनीच्या नियमानुसार या ट्रिगर अंतर्गत 21 दिवसाचा पावसाचा खंड झाल्यानंतर ही भरपाई लागू पडते व जरी या 21 दिवसां दरम्यान पाऊस पडला तरी तो पाऊस 2.4 एम एम पेक्षा जास्त नसावा असा कंपनीचा नियम आहे, तसेच सलग 21 दिवस पावसाचा खंड हा नियम चुकीचा आहे,पावसाचा खंड हा पंधरा दिवसाचा तरी धरायला हवा परंतु जर या कंपनी नियमानुसार 25% अग्रीम पीक विम्यासाठी 21 दिवसाचा पावसाचा खंड पाहिजे हा नियम पकडला तरी लातूर जिल्ह्यात 27 जुलैपासून आजतागायत 2.4 एम एम  पेक्षा जास्त पाऊस पडलेला नाही त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात 25% अग्रीम पिकविमा मिळायला काहीच हरकत नाही अशी परिस्थिती सध्याची आहे.
     परंतु लातूर जिल्ह्यात पर्जन्यमापन यंत्र बसवण्याचे कंत्राट ज्या स्कायमेट कंपनीकडे आहे त्यांनी पिकविमा कंपनी व कृषी विभाग यांच्याशी संगणमत करून त्यांचे पर्जन्यमापक यंत्र अनेक ठिकाणी बंद पडलेले असतानाही ज्या ठिकाणी पाऊसच  पडला नाही अशा ठिकाणीही पाऊस पडला आहे असे दाखवून पावसाचा खंड 21 दिवसांपेक्षा कमी दाखवण्याची खटपट करून शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा जास्त ठिकाणी मिळू नये यासाठी षडयंत्र केले आहे. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी 17,18,19,20 दिवसाचाच खंड दाखवला आहे. 19 ऑगस्टला जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले होते व थोडा भुरभुर पाऊस आला होता त्या दिवशी 19,20,21 ऑगस्टला पाऊस 2.4 एम एम  पेक्षा जास्त पाऊस पडला असे भासवून 21 दिवसांपेक्षा जास्तअसलेला पावसाचा खंड कमी केला गेला आहे. त्यामुळे या बोगस पावसाच्या अहवालामुळे संपूर्ण जिल्ह्यात एक महिन्याच्या आसपास पावसाचा खंड असतानाही जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडून खूप कमी महसूल मंडळ 25 % अग्रीम विम्या संदर्भातील अधिसूचना काढली जात आहे. यासोबतच नुकसान भरपाई संदर्भात 72 तासांच्या आत ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीकडे तक्रार केली आहे त्यांचेही पंचनामे कंपनीने बोगस पद्धतीने करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळूच नये या पद्धतीने काम केले आहे. तसेच मागील विमा कंपनीने 2022 मधील तूर पिकांचे क्लेम आणखीन दिले नाहीत तर यावर्षी एसबीआय जनरल या कंपनीने खरीप 2023 चे पीक कापणी प्रयोगाची नियोजन केलेले नाही.
  या बाबींचा गांभीर्याने विचार करून जिल्हाधिकारी यांनी पावसाचे बोगस अहवाल देणाऱ्या स्कायमेट कंपनीवर कार्यवाही करावी, तसेच शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व त्यांची कार्यालय नेहमी बंद ठेवणाऱ्या व कामात हयगय करणाऱ्या, शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही खोटे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू नये यासाठी षडयंत्र करणाऱ्या  एसबीआय जनरल  या पीकविमा कंपनीवर कार्यवाही करून त्यांना काळे यादीत टाकावे व लातूर जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात 25% अग्रीम पिकविमा भरपाई मंजूर करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने लातूर जिल्हाभर तीव्र आंदोलन करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर मनसेचे सरचिटणीस तथा मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष 
संतोष नागरगोजे,डॉ.नरसिंह भिकाने , शिवकुमार नागराळे, संजय राठोड ,भागवत शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

أحدث أقدم