महाराष्ट्र औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जी पँट/नायपर व गेट परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न
निलंगा/प्रतिनिधी- भारतील फार्मसी क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या जी पँट, नायपर व गेट परीक्षेत महाराष्ट्र काँलेज आँफ फार्मसी/महाराष्ट्र औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय निलंगा येथे विदयार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात, ओमकार कापसे- (रँक-255),महारूद्र कापसे(रँक-454),सागर कुलकर्णी(रँक-677),केदार निला(रँक-807), दया करकोले(रँक-1098),अनिकेत चिल्लरगे (रँक-1158),राहूल सुरवसे(रँक-1228),वैष्णवी बुधे(रँक-1615),चैतन्य आवळे(रँक-2420) अविनाश गोरे(रँक-2818),प्रियंका जैन(रँक-4772),प्रिती सुर्यवंशी(रँक-4788) या विद्यार्थ्यांचा शाल, ट्रॉफी व औषधी वनस्पतीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र महाविद्यालय निलंग्याचे प्राचार्य डॉ. एम. एन. कोलपुके महाराष्ट्र पॉलिटेक्निक डी फार्मसी इन्स्टिट्यूट निलंगा प्राचार्य डॉ. बी. एन. पौळ महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंग्याचे प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील इत्यादींनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या जी पँट, नायपर व गेट परीक्षा बी फार्मसी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी असून ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना एम फार्मसी च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवता येतो तसेच या परीक्षा उत्तीर्ण होऊन एम. फार्मसी पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी पेट या परीक्षेतून सूट मिळते.
विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमा दरम्यान कसा अभ्यास करावा याचे सखोल मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. कोलपूके सरांनी त्यांच्या शैक्षणिक जडणघडणीसाठी विशेष मार्गदर्शन केले. डॉ. बी. एन. पौळ यांनी विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांची मदत कशी घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन व माहिती दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रम अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील यांनी महाविद्यालयातर्फे घेण्यात येत असलेल्या विषय सुविधांचा उल्लेख केला व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थी, पालक,बि.व.एम. फार्मसी चे विद्यार्थी जीपॅट सेलचे समन्वयक प्राचार्य सुनील गरड, डॉ. शरद उसनाळे, डॉ. चंद्रवदन पांचाळ सर तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षक इतर कर्मचारी हे या सत्कार सोहळ्यास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य चंद्रवदन पांचाळ आणि आभार प्रदर्शन प्राचार्य सुनील गरड यांनी मांडले.
कै/स्व. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब,जी पँट, नायपर,जेईई.चि.कुलकर्णी सागर यास (AIR-107) महाराष्ट्र फार्मसी ॲल्युमिनि असोसिएशन निलंगा तर्फे सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास कै.अमोल अशोकराव आवटे यांच्या स्मरणार्थ रुपये 5000 रोख डॉ.बि.एन.पौळ यांच्या तर्फे प्रदान करण्यात आला.
إرسال تعليق