स्लरी फिल्टर संयंत्रासाठी शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदान

 


स्लरी फिल्टर संयंत्रासाठी शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदान

·        पंचायत समितीमध्ये 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत

लातूर: रासायनिक खाते व कीटकनाशकांचा वापर कमी व्हावा, जमिनीतील सेंदीय कर्बाचे प्रमाण वाढून जमिनीची सुपीकता वाढावी यासाठी सेंद्रिय खताचा वापर होणे आवश्यक आहे. यासाठी सुधारित कृषि पध्दतीच्या प्रात्यक्षिका अंतर्गत शेतकऱ्यांसाठी स्लरी फिल्टरचे प्रात्यक्षिक आयोजित करण्याचा निर्णय लातूर जिल्हा परिषदेने घेतला आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर डीबीटी तत्वावर स्लरी फिल्टर देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित पंचायत समितीमध्ये 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी सुभाष चोले यांनी केले आहे.

स्लरी फिल्टरसाठी या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला यांना प्राधान्य राहणार आहे. शेतकऱ्यांनी स्‍वतःचा सातबाराआठ अआधार कार्डबँक पासबुकाच्‍या प्रथम पानाची छायांकित प्रतलाभार्थीं अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमातीचे असल्‍यास जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांग लाभार्थींसाठी दिव्यांगत्‍वाच्‍या दाखल्‍याच्‍या छायांकित प्रतीसह  पंचायत समितीकडे अर्ज करावेत.

लाभार्थींची निवड केल्‍यानंतर शेतकऱ्यांनी एका महिन्‍याच्‍या आत खुल्‍या बाजारातून अधिकृत विक्रेत्‍याकडून आपल्‍या पंसतीच्‍या स्‍लरी फिल्‍टर संयंत्राची खरेदी करावी लागेल. खरेदी करावयाचे स्‍लरी फिल्‍टर संयंत्र सक्षम तपासणी संस्‍थांनी परिक्षण करुन ते बीआयएस. अथवा अन्‍य संस्‍थानी निश्चित केलेल्‍या प्रमाणकानुसार तांत्रिक निकषानुसार असणे गरजेचे आहे. स्‍लरी फिल्‍टर संयंत्रासाठी जास्‍त अर्ज प्राप्‍त झाल्‍यास लक्षांकानुसार सोडत पध्‍दतीने लाभार्थ्‍यांची निवड संबंधित पंचायत समिती स्‍तरावर करण्‍यात येईल. मंजूर स्‍लरी फिल्‍टर संयंत्राचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्‍या बॅंक खात्‍यावर डीबीटी प्रणालीद्वारे अदा करण्‍यात येईल.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्‍या पंचायत समिती कार्यालयाकडे परिपूर्ण अर्ज, आवश्यक कागदपत्रासह सादर करावेत, असे अवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने