लातूर जिल्ह्यात शासकीय कार्यालयांमधील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्रण शपथ
लातूर: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित आयोजित अमृत सप्ताहाला आजपासून प्रारंभ झाला. यानिमित्त आज सर्व शासकीय कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी यांनी देशाच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी पंचप्रण शपथ घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी पंचप्रण शपथ घेतली. अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, नितीन वाघमारे, सुचिता शिंदे, अहिल्या गाठाळ, संगीता टकले, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका कांबळे यावेळी उपस्थित होत्या.
*जिल्हा परिषद*
जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी यांना पंचप्रण शपथ दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, दत्तात्रय गिरी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे, उप लेखा व वित्त अधिकारी श्री. देव, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
*जिल्हा पोलीस अधीक्षक*
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी पंचप्रण शपथ घेतली. अपर पोलीस डॉ. अजय देवरे, पोलीस उपाधीक्षक (गृह) अंगद सुडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्यासह पोलिस अधिकारी, अंमलदार तसेच कर्मचारी यावेळी उपस्थित होते. लातूर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस कार्यालये, पोलीस ठाणे येथेही अधिकारी कर्मचारी यांनी पंचप्राण शपथ घेतली.
*लातूर शहर महानगरपालिका*
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत लातूर शहर महानगरपालिकेत अधिकारी, कर्मचारी यांनी पंचप्रण शपथ घेतली. अतिरीक्त आयुक्त शिवाजी गवळी, उपायुक्त मयुरा शिंदेकर, वीणा पवार, सहाय्यक आयुक्त मजुषा गुरमे, मुख्य लेखाधिकारी श्री.कोलगणे, मुख्य लेखा परीक्षक कांचन तावडे, सहायक लेखाधिकारी समद शेख, शिक्षणाधिकारी एस. एल. जाधव यांच्यासह विभागप्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
*विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय*
‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत लातूर विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी माहिती उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे यांच्या उपस्थितीत पंचप्रण शपथ घेतली. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सहायक संचालक डॉ. श्याम टरके, माहिती अधिकारी तानाजी घोलप, उपसंपादक रेखा पालवे यांच्यासह विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा