आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून रोहयो अंतर्गत १४ कामासाठी १ कोटी ७० लाख निधी मंजूर
लातूर - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सात गावातील एकूण १४ कामासाठी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून १ कोटी ७० लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे.
महाराष्ट्रात मनरेगा अंतर्गत मागेल त्याला काम या ऐवजी मागेल त्याला काम आणि हवे ते काम या ध्येयाने कार्यरत असलेल्या महायुती शासनाच्या रोहयो नियोजन विभागाने लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील ७ गावात १४ कामांना मान्यता दिली असून यासाठी १ कोटी ७० लाख निधी मंजूर केला आहे. सदरील मंजूर निधीतून त्या त्या गावात पेवर ब्लॉक रस्त्याची कामे करण्यात येणार आहेत.
भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी राज्याचे रोहयो मंत्री ना. संदिपान भुमरे यांच्यासह सर्व संबंधिताकडे पाठपुरावा केल्यामुळे लातूर ग्रामीण मतदार संघात रेणापूर तालुक्यातील रामवाडी (पा) २० लक्ष रुपये, लातूर तालुक्यातील करकट्टा २० लक्ष, वांजरखेडा तीन कामे ३० लक्ष, भातांगळी १० लक्ष, मुरुड येथे चार कामे ५० लक्ष रुपये आणि औसा तालुक्यातील भादा सर्कलमधील उटी बु. तीन कामे ३० लक्ष रुपये, शिंदाळा १० लक्ष रुपये याप्रमाणे एक कोटी ७० लाख रुपये खर्चाच्या पेव्हर ब्लॉकच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. सदरील कामाला मंजुरी मिळवून दिल्याबद्दल भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांचे त्या त्या गावातील भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा