राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन

 राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन




लातूर-येथील राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या वतीने मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भव्य सायकल रॅली काढण्यात आली.
जिल्हा क्रीडा संकुल येथून सकाळी ७.०० वाजता सायकल रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली औसा रोड, शिवाजी चौक, मिनी मार्केट मार्गे जाऊन शाळेच्या मैदानावर सांगता झाली. लाहोटी स्कुलच्या वतीने काढण्यात आलेल्या सायकल रॅलीला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातून निघालेल्या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीदरम्यान त्यांनी ‘हम फिट तो इंडिया फिट, हम खेलेंगे तो बढेगा इंडिया, भारत माता की जय, वंदे मातरम’ अशा घोषणा दिल्या.
श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे संचालक आशिष अग्रवाल आणि प्राचार्य कर्नल श्रीनिवासुलू यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती. प्रारंभी प्रमुख मान्यवरांनी क्रीडा संकुल येथील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहिले व  भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखविली.
रॅलीला संबोधित करताना प्राचार्य कर्नल श्रीनिवासुलू यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले आणि जीवनातील खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी पुढे विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम करून तंदुरुस्त राहण्याचे आणि किमान एक खेळ खेळण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अणि आभार प्रदर्शन विनोद चव्हाण यांनी केले.
सायकल रॅलीच्या यशस्वितेसाठी स्कूलच्या रजिस्ट्रार प्रवीण शिवनगीकर, विनोद चव्हाण, कॅप्टन बी.के.भालेराव, शैलेंद्र डावळे, संदिप केंद्रे, हणमंत थडकर, गजानन जोशी, किशोर पांचाळ, अमित होनमाळे, बसवराज वडेवाले, तेजस धुमाळ, अमोल देशमुख, प्रशांत शिंदे, प्रकाश जकोटीया, विवेक डोंगरे, अरुण भोगे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने