देहदानाचा संकल्प डोंगरे दाम्पत्यानीं केला
लातूर:- वाले नगर खाडगाव रोड लातूर येथील रहिवासी असलेले शिवाजी डोंगरे व त्यांच्या पत्नी सौ. मनोरमा शिवाजी डोंगरे या पती पत्नीने लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मरणोत्तर देह दानाचा संकल्प केला. वैद्यकीय शिक्षणासाठी ऊपयोग व्हावा म्हणून मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प डोंगरे दाम्पत्यांनी केला,याबाबतीत नियमानुसार सर्व बाबींची पुर्तता करून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीर रचना शास्त्र विभागात उद्धव बाळासाहेब ठाकरे लातूर शिवसेनेचे जेष्ठ शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते त्र्यंबक स्वामी यांनी, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शरीर रचना शास्त्र विभाग देहदान समिती सदस्य प्रा. डॉ संतोष डोपे यांचेकडे रितसर नोंदणी अर्ज भरून दिला .
आज विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ समीर जोशी व महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा सहसंपर्कप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना ओळखपत्र देण्यात आले , यावेळी बोलताना अधिष्ठाता समीर जोशी यांनी डोंगरे दाम्पत्यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी महासंघाचे उपसभापती तथा शिवसेना सहसंपर्कप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी, अधिष्ठाता डॉ समीर जोशी, डॉ. संतोष डोपे, महानगर प्रमुख विष्णूपंत साठे, वैद्यकीय महाविद्यालय अभ्यागत मंडळाचे सदस्य त्र्यंबक स्वामी, शिवसेना लातूर शहर प्रमुख रमेश माळी, कामगार सेना लातूर जिल्हाध्यक्ष तानाजी करपुरे, महाराष्ट्र अटोरिक्षा चालक सेनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष बंडूसिंग भाट, सचिन पाटील युवा सेना उपजिल्हाप्रमुख किशोर मोहिते, कृष्णा जाधव, सिद्धेश्वर जाधव,सचिन डोंगरे आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा