सलोखा योजनेचा जिल्ह्यातील पहिला लाभार्थी औसा तालुक्यातला
दुय्यम निबंधक कार्यालयातुन अपर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला
औसा:महाराट्र शासनाने शेतक-यामध्ये मालकी हक्काचे वाद, बांधावरुन होणारे वाद, रस्त्याचे वाद व मोजनीवरुन होणारे वाद संपुष्टात यावेत यासाठी सलोखा नावाची योजना सुरवात केलेली आहे. यामध्ये शेतक-याच्या नवावरील शेत जमिनीचा ताबा दुस-या शेतक-याकडे व दुस-या शेतक-याचा ताबा पहील्या शेतक-याकडे म्हणजेच जमिनीची अदलाबदल होणे. यासाठी या योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाने नाममात्र 1000/- रुपये मुद्रांक शुल्क व 1000/- रुपये नोंदणी फी आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे..
अशा दस्ताची नोंदणी करण्यासाठी कांही बाबीची पुर्तता होणे आवश्यक आहे. जसे तलाठी व मंडळ अधिकारी यांचा पंचनामा त्याची प्रमाणीत प्रत दस्तासोबत जोडणे व सदर मिळकत ही 12 वर्ष शेतक- याच्या ताब्यात असणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने दिनांक 04/08/2023 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय औसा येथे औसा तालुक्यातील मौजे हिप्परगा (क) येथील 1) सुनिता दयानंद सपकाळ व 2 ) मुकुंद चंद्रकांत माने यांच्या सलोखा योजनेअंतर्गत गट दुरुस्ती लेखाचा पहिला दस्त नोंदणी करण्यात आला.सदर दस्ताची नोंदणी होत असताना सुनिल यादव अप्पर जिल्हाधिकारी लातूर, अविनाश कोरडे उपविभागीय अधिकारी औसा , रेणापूर, हेमंत निगडे उप अधिक्षक भुमी अभिलेख तसेच भरत सुर्यवंशी तहसिलदार , निलन होनमारे अप्पर तहसिलदार त्या बरोबर दुय्यम निबंधक श्रेणी 1 औसा या कार्यालयाचे दुय्यम निबंधक विशाल जगदाळे अधिकारी / कर्मचारी व संबधीत पक्षकार यांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा