डॉ. सुभाष मिसाळ, प्रा. चंद्रकांत पाटील सेवानिवृत्त

डॉ. सुभाष मिसाळ, प्रा. चंद्रकांत पाटील सेवानिवृत्त

औसा: येथील श्री कुमारस्वामी महाविद्यालयात कार्यरत असलेले भौतिकशास्त्र विभागप्रमुख उपप्राचार्य डॉ. सुभाष मिसाळ आणि कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. चंद्रकांत पाटील हे प्रदीर्घ सेवेनंतर जुलै अखेर सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने महाविद्यालयात सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री महंतस्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते व संस्थेचे सचिव गिरीश पाटील, लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. सुभाष मिसाळ आणि प्रा. चंद्रकांत पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यास सेवानिवृत्त व्हावे लागते त्यानुसारच डॉ. सुभाष मिसाळ आणि प्रा. चंद्रकांत पाटील हे विद्यार्थी प्रिय शिक्षक आपला कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत ही समाधानाची बाब असल्याचे मत यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे समन्वयक सुधाकर पाटील,विश्वस्त प्रा. सूर्यभान जाधव, प्रा. मोहम्मद हनीफ आलूरे, अरविंद कुलकर्णी, राजशेखर बिराजदार, माजी नगराध्यक्ष सुनील मिटकरी, चंदूआप्पा राचट्टे, जुक्टा महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. विलास जाधव, प्रा. शिवराम सूर्यवंशी, प्रा. बाळासाहेब बचाटे, प्रा. शिवाजी शिंदे, लाळी गावचे सरपंच साक्षी बिराजदार, उपसरपंच गुणवंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. एखादा शिक्षक विद्यार्थी प्रिय तेव्हाच होतो जेव्हा तो आपला विषय अतिशय तळमळीने आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने शिकवतो, डॉ. सुभाष मिसाळ आणि प्रा. चंद्रकांत पाटील हे विद्यार्थी प्रिय शिक्षक सेवानिवृत्त होत असल्याने महाविद्यालयास अशा शिक्षकांची उणीव निश्चितच भासणार आहे असे मत यावेळी बोलताना संस्थेचे सचिव गिरीश पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी प्रा. मोहम्मद हनिफ आलूरे, ग्रंथपाल प्रा. अंबादास खिलारे, प्रा. युवराज धसवाडीकर, डॉ. बळवंत घोगरे, सुनीलप्पा मिटकरी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
     या कार्यक्रमास डॉ. सुनील पुरी, डॉ. कर्मवीर कदम, डॉ. विनायक वाघमारे, डॉ. जांबुवंतराव कदम, डॉ. कुसुम ढोणे, प्रा. ज्योती भोसले, प्रा. प्रवीण उटगे, प्रा. मदन मुळजे, प्रा. रवींद्र कारंजे, डॉ. गणेश मनगिरे, प्रा. मधुकर कदम, प्रा. शिवराज मिटकरी, डॉ. बालिका कांबळे, अनिता दामावले, विश्वप्रताप चौहान, जानी शेख, व्यंकट गायकवाड यांच्यासह आजी माजी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, लाळी गावचे ग्रामस्थ, डॉ. मिसाळ तसेच प्रा. पाटील यांचे परिवारातील सदस्य व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधीर गरड यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने