विद्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रकारची समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत:- अभिजित कुडे

विद्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रकारची समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत:- अभिजित कुडे 
नुतन नेहरू विद्यालय नागरी, कीसान विद्यालय माढेळी, शिवाजी विद्यालय खांबाळा येथील विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन 
वरोरा:- श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविन्द्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून खद खद फेम आदरणीय नितेश कराळे सरांच्या विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे त्या संबंधी विद्यार्थ्यांंना माहिती दिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना मार्फत करत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रकारची समस्या बाबत मदतीसाठी कटिबद्ध आहे असा विश्वास दिला. अपंग, निराधार, अनाथ, दुर्बल विद्यार्थ्यांंची मदतीसाठी नेहमी प्रयत्नशील आहेत असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले. विधानसभा प्रमुख रविन्द्र शिंदे व तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले व समस्या जाणून घेतल्या यावेळी रोशन भोयर उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم