कोरडा दुष्काळ जाहीर करुन तात्काळ सरसकट पिकविमा मंजूर करा-छावा संघटना

कोरडा दुष्काळ जाहीर करुन तात्काळ सरसकट पिकविमा मंजूर करा-छावा संघटना
औसा/प्रतिनिधी- गेल्या एक महीन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे औसा तालुक्यात व परिसरात पिकांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. आज रोजी पिके ७० टक्के संपुष्टात आलेली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. गेल्या वर्षी अतीवृष्टीने शेतक-याला भयानक आसमानी संकटाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळीही राज्य सरकारच्या वतीने शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारच्या वतीने करण्यात आले होते. आज कोरडा दुष्काळ पडल्याने आजही संकटाची मालीका शेतक-यांची पाठ सोडत नाही. त्यामुळे शेतक-याला आधार देण्यासाठी संपुर्ण औसा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करुन शेतक-याना प्रती हेक्टरी १ लाख रु. अनुदान रुपी मदत करुन शेतक-यांना धीर द्यावा ही मायबाप सरकारला शेतक-यांच्या वतीने विनंती. अन्यथा छावा संघटना संबध औसा तालुक्यातील शेतक-यांना सोबत घेऊन संबध औसा तालुक्यात तिव्र आंदोलन छेडल व शेतक-यांना न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही याची नोंद प्रशासनाने घ्यावी. यावेळी उपस्थित विजयकुमार घाडगे पाटील, भगवानदादा माकणे, विष्णु महाराज कोळी, मनोज लंगर, नितीन साळुंके, पांडु कोळपे, बालाजी श्रीमंगले, बाबु पाटील, मारुती मुडबे, किशोर सुरवसे, राहुल शिंदे, गणेश साळुंके आदींच्या सह्या केल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने