‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे राज्य महिला आयोगाची लातूर येथे जनसुनावणी
महिलांना जनसुनावणीमध्ये मांडता येणार तक्रारी
लातूर-महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत सोमवार, 28 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 11 वाजता लातूर येथे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जनसुनावणीमध्ये महिलांना आपल्या तक्रारी स्थानिकस्तरावर थेट मांडता येईल. कोणतीही पूर्वसूचना न देता महिला आपल्या तक्रारी सुनावणीस उपस्थित राहून थेट लेखी स्वरुपात मांडू शकतील.
जिल्हातील महिलांनी कोणत्याही शासकिय विभागाकडील अथवा कौटुंबिक हिंसांचार संबंधीच्या प्रलंबित असलेल्या तक्रारींबाबत किंवा नवीन तक्रार लेखी नोंदविण्यासाठी जनसुनावणीला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी देवदत्त गिरी यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा