अथर्व माशाळकर यांनी केला सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा

अथर्व माशाळकर यांनी केला सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा 
औसा/ प्रतिनिधी- वाढदिवस साजरा साजरा करणं हे फक्त स्वतःच्या आनंदा पुरतं मर्यादित असते, पण अथर्व माशाळकर या तरुणाने आपण समाजाचे देणं लागतो हा हेतू ठेवून इतरांनाही आपल्या आनंदात सामावून घेतले.
 अथर्व नेआपला वाढदिवस जमा केलेल्या पैश्यातून सुआश्रय निवासी अपंग विद्यालय, इंडिया नगर, लातूर येथील अपंग विद्यार्थ्यांना नाश्ता व गोड पदार्थ दिले व त्यांच्या उपस्थित आपला वाढदिवस साजरा केला.
त्यानंतर संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलाचे बालगृह लातूर येथे जाऊन मुलांना खिचडी, गोड पदार्थाचे वाटप केले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खरे समाधान मिळाले अथर्व माशाळकर व त्यांच्या सोबत असणा-या
मित्राराने व्यक्त केले.
अथर्व माशाळकर मित्रामध्ये गुरु, पियुष, अनिकेत, चैतन्य, रितेश, युवराज, सुमित, संविधान, आदित्य, हेमंत, रोहन, सुजित, हर्ष, निखिल, किशन, आणि विशाल या मित्रांनी कार्यक्रसाठी परिश्रम घेतला.
या नावीन्यपूर्ण वाढदिवस साजरा केल्याने  स्नेही, नातलग आणि जेष्ठ मंडळीने कौतुक केले व असे पुढेही अनेक समाजपयोगी कार्य अविरत व्हावे अशी सदिच्छा व्यक्त केल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने