बाजारपेठ राख्यांनी सजली

 बाजारपेठ राख्यांनी सजली


लातूर : प्रतिनिधी-बहीण भावाचे अतूट नाते सांगणारे रक्षाबंधन दोन दिवसांवर आले असून लातूरच्या बाजारपेठेत विविध प्रकारच्या राख्याने बाजारपेठ सजली आहे. यंदाच्या रक्षण बंधनामध्ये फॅन्सी राख्यांना अधिक पसंती मिळत आहे. राखी पौर्णिमा या उत्साहात होण्याची शक्यता असल्याने व्यापारी बांधवांनी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या फॅन्सी राख्या विकण्यासाठी बाजारपेठेत आणल्या आहेत. बहीण-भाऊ या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. ंिहदू संस्कृतीनुसार श्रावणातील नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो.

बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी ओवाळणी व प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. आपल्या लाडक्या भावासाठी बहीण राखी खरेदी करीत आहे. यंदा मात्र गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी २० टक्क्यांनी राख्याचे दर वाढले आहेत. यावर्षी अनेक रंगीबेरंगी फॅन्सी राख्यंनी लातूरच्या बाजारपेठेतील दुकाने फुलली आहेत. लहान मुलांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या, राख्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. यात राखी डिझाईन ओम, स्वास्तिक, श्री, कार, मोर, चांदी, कलर स्टोन, पारंपारिक पद्धतीच्या गोंडा, दोरी आदी प्रकारच्या फॅन्सी राख्यांनीलातूरची बाजारपेठ सजली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने