युवक शेतकरी झाला ‘रेशीम’चा यशस्वी उद्योजक

 युवक शेतकरी झाला ‘रेशीम’चा यशस्वी उद्योजक

लातूर : प्रतिनिधी-लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतीपूरक व्यवसायांच्या अंतर्गत तुती लागवड व रेशीम उद्योगासाठी २०१७ पासून बिनव्याजी कर्जे २ लाख रुपयांपर्यंत पुरवठा सुरु केला असून त्याचा जिल्ह्यातील अनेक शेतक-यांनी लाभ घेतला आहे त्यामुळे तुती लागवडीत वाढ झाली आहे. बँकेच्या आर्थिक मदतीने तालुक्यातील गादवड येथील युवक शेतकरी आकाश जाधव हे यशस्वी रेशीम उद्योजक म्हणून पुढे येत आहेत.

पूर्वी लातूर जिल्ह्यात चॉकी सेंटर नसल्याने चॉकी (अंडीपुंज) साठी रेशीम उद्योजकाना रेशीम उद्योगासाठी लागणा-या आळ्या (चॉकी) कर्नाटकातून मागवाव्या लागत असे. आता मात्र मराठवाड्यातील रेशीम उद्योजकाना आळ्या गादवड येथील चॉकी सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. लातूर जिल्हा बँकेच्या वेगवेगळ्या योजनेतून अनेक उद्योग उभे राहीलेले असताना आता यशस्वी रेशीम उद्योजक शेतकरी आकाश जाधव यांनी २ एकर शेती असलेल्या जिल्हा बँकेकडून मिळालेल्या आर्थिक मदतीने यशस्वी उद्योजक म्हणून उभा राहिला आहे. आज दरमहा सव्वा लाख रुपयांची उलाढाल खर्च वजा जाता दरमहा ८० हजार रुपये उत्पन्न मिळवत यशस्वी उद्योजक तयार झाला आहे
माजी मंत्री दिलीपराव देशमुख,

बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज देशमुख यांची भेट
लातूर जिल्ह्यातील गादवड येथील आकाश जाधव या तरुण शेतक-याने सुरवातीला जिल्हा बँकेकडून बिनव्याजी २ लाख रेशिम लागवडीसाठी कर्ज घेतले ते मुदतीत फेडले. पुन्हा चॉकी सेंटरसाठी १२ लाख रुपये कर्ज घेतले त्याची उभारणी केली. यातून आज नवीन उद्योजक तयार झाला आहे. या चॉकी सेंटरमुळे मराठवाड्यातील रेशीम उद्योजकाना अंडीपुंजासाठीसाठी बेंगलोर येथे जावे लागत, असे आता मात्र लातूर जिल्ह्यातील पहिले चॉकी सेंटर गादवड येथे उभे राहिल्याने रेशिम उद्योजक इथे खरेदीसाठी येत उलाढाल सुरु झाली आहे.

या चॉकी सेंटर व रेशीम उद्योगाची जिल्हा बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख व जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी रेशीम उद्योग चॉकी सेंटरची पाहणी केली समाधान व्यक्त करत या उद्योगासाठी युवक शेतक-यांनी पुढें येण्याची गरज आहे. जिल्हा बँक यासाठी सभासद शेतक-यांना कर्ज पुरवठा करुन सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली तसेच नविन उद्योजक आकाश जाधव यांचेही कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم