रामनाथ विद्यालयात क्रांती दिनानिमित्त विविध उपक्रम

 रामनाथ विद्यालयात क्रांती दिनानिमित्त विविध उपक्रम
 आलमला:- श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अलमला येथे दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांगता सोहळा कार्यक्रमाच्या उपक्रम अंतर्गत विद्यालयातील सहशिक्षक श्री भास्कर सूर्यवंशी यांनी विद्यार्थी व सर्व कर्मचाऱ्यांना भारतीय स्वातंत्र्याचे मूल्य डोळ्यासमोर ठेवून घेतली जाणारी'पंचप्राण शपथ'दिली. तसेच विद्यालयातील सहशिक्षिका सौ. आमरजा कापसे यांनी विद्यार्थ्यांना तृणधान्याचे विविध महत्व सांगून आपल्या आहारामध्ये त्यांचे किती महत्त्व आहे हे गोष्ट रुपी सांगत जंक फूड टाळण्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता पाटील, पर्यवेक्षक पी.सी.पाटील विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने