राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्निक हासेगाव येथे माझी माती माझा देश अभियान


राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्निक हासेगाव येथे माझी माती माझा देश अभियान

    औसा/प्रतिनिधी- श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्निक व लातूर कॉलेज ऑफ औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने हासेगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त महाविद्यालयात माझी माती माझा देश या अभियानास महाविद्यालयाच्या प्रांगणात पंचप्राण शपथ घेऊन व इतर कार्यक्रमाचे आयोजन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी "मिट्टी को नमन, विरों का वंदन" या घोषवाक्याच्या घोषणा देण्यात आल्या. या अभियानातून भारताला विकसित देश बनवणे, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणे, एकता व बंधुता टिकवून ठेवणे, आदर्श नागरिकाची कर्तव्य पार पाडणे व देशाचे रक्षण करण्याचा अभिमान बाळगणे हा हेतू आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
   यावेळी संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे सचिव वेताळेश्वर बावगे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे संचालक नंदकिशोर बावगे प्राचार्य संतोष मेदगे प्राचार्या योगिता बावगे प्रा.गायकवाड एस एन, प्रा.पाटील डी पी, प्रा. पंचाक्षरी एस एम, प्रा. कल्याणकर एस ए, प्रा. ताडके के डी, प्रा. पठाण एस ए, सवाई मनदीप , पाटील ए आर, किसवे एस आर, माने एस एस व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने