रामलिंग मुदगड येथील विविध विकास योजनांत लाखोंचा भ्रष्टाचार,सरपंच व ग्रामसेवकाची सखोल चौकशी करा- माजी तंटामुक्ती अध्यक्ष मठपती
लातूर - निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध विकास योजनांमध्ये निकृष्ठ दर्जाची कामे करणे तर काही योजनांमध्ये कामे न करताच बिले उचलून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्या प्रकरणी गावचे सरपंच व ग्रामसेवक यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांचेवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. अशा मागणीचे तक्रारी निवेदन आज 28 ऑगस्ट रोजी रामलिंग मुदगडचे माजी तंटामुक्त अध्यक्ष शिवानंद मठपती यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांना दिले आहे.सदर निवेदनात म्हटले आहे की, निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत ग्रामनिधीमध्ये किती वसुली झाली, किती खर्च झाला याची चौकशी करावी, तसेच रोजगार हमी योजना अंतर्गत, पंधरावा वित्त आयोग, शौचालय योजना अंतर्गत शौचालय न बांधता लाभार्थ्यांना हाताशी धरून बिले उचलणे, शोषखड्डे, पाणी पुरवठा योजना, दलित वस्ती सुधार योजना घरकुल योजना या सर्व विकास कामांच्या योजनेत सरपंच व ग्रामसेवक यांनी संगणमत करून निकृष्ठ दर्जाची कामे करणेयय, तर अनेक योजनांत कामे न करताच बिले उचलून ती हडप करून लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सदर निवेदनात केला असून संबंधित सरपंच व ग्रामसेवकाची खातेनिहाय सखोल चौकशी करून त्यांचेवर कठोर कार्यवाही करावी. अशी मागणी शिवानंद मठपती यांनी केलेली आहे.
..............................
टिप्पणी पोस्ट करा