आ.पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याच्या निषेध शिवसेनेच्या वतीने दुग्धाअभिषेक व जल अभिषेक करुन प्रतिमेचे केले शुध्दीकरण

आ.पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याच्या निषेध शिवसेनेच्या वतीने दुग्धाअभिषेक  व जल अभिषेक करुन प्रतिमेचे केले शुध्दीकरण
औसा -आ.पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करुन आपणच कसे श्रेष्ठ आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निषेधार्थ औसा शिवसेनेच्या वतीने त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देऊन आ.अभिमन्यू पवार यांच्या बॅनर ला जोडे मारो आंदोलन करुन निषेध करण्यात आला.
 यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या कुशल नेतृत्वात उपजिल्हा प्रमुख बजरंग दादा जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे यांच्या पुढाकाराने औसा तालुक्यातील समस्त शिवप्रेमी सकल मराठा समाज व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे औसा तालुका यांच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले . यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक व जल अभिषेक करून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे शुद्धीकरण करण्यात आले आणि भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या विरोधात घोषणा देऊन मदमस्त सत्तेच्या नशेत मगरूर असणाऱ्या भाजप आमदाराला जोडे मारून आंदोलन करण्यात आले व औसा तालुक्याचे सन्माननीय तहसीलदार साहेब यांना या आमदारावर कठोरातील कठोर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी बोलत असताना शिवसेना तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे म्हणाले की छत्रपती शिवरायांच्या समोर भल्या भल्याचे मस्तक नतमस्तक झाल्या शिवाय राहत नाही ज्यांचा त्याग, ज्यांच्या बलिदानाची इतिहासात एवढी मोठी नोंद आहे ज्यांच्या खांदयावर स्वराज्याचा भगवा सतत असायचा असे हिंदवी स्वराज संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात ठेवून हा घोषणाबाजी करतो व आपले भाषण देतो या आमदाराला लाज कशी वाटली नाही यापूर्वी भाजपच्या वाचाळविराने त्यांच्या कृतीतून महाराष्ट्रातील थोर महापुरुषांचे अवमान केलेला आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज, धर्म विर छत्रपती संभाजी महाराज,क्रांतीज्योती मा सावित्रीबाई फुले असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील यांचा वेळोवेळी या महाराष्ट्रामध्ये भाजपचे राज्यपाल भगतसिंग कोशायरीसह या भाजपच्या इतर नेते आमदार खासदार यांनी वेळोवेळी अवमान केलेला आहे.आता यापुढे भाजपचा एकही पिलावळ्याने अवमान करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राची जनता महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमी शिवभक्त सकल मराठा समाज यांना कदापि माफ करणार नाही आणि या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो यापुढे भाजपच्या एकाही पिलावळ्याने असं दुष्कृत करण्याचा सहस केलं तर त्याची गाढवावर बसून धींड काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.
यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख बजरंग दादा जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे,माजी तालुका प्रमुख संजय भाऊ उजळंबे,शिवसेना माजी शहर प्रमुख जयंत भाऊ चंदनशिवे , शिवसेना तालुका समन्वयक संतोष सूर्यवंशी, सह समन्वयक महादेव साळुंखे, छावा मराठा ग्रुपचे तालुका अध्यक्ष नागेश आबा मुगळे,शिवसेना उपशहर प्रमुख सचिन पवार, ऊपतालुका प्रमुख प्रवीण कवाळे, बाबू कारभारी, ज्ञानबा चिल्ले शिवसेना महिला आघाडीच्या प्रीती ताई कोळी , रेश्मा ताई होळकर, गोविंद खंडागळे, युवा सेना लातूर जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब नरवडे, युवा सेना शहरप्रमुख आकाश माने, संपर्क दूत किरण कदम, युवा सेना तालुका समन्वयक महेश क्षीरसागर, वैभव मोरे, सुमित कोडे, युवा सेना उप शहरप्रमुख अभिषेक पळसे, सह शिवसैनिक शिवप्रेमी सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने