महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार- आ. रमेशआप्पा कराड

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार- आ. रमेशआप्पा कराड
        लातूर - बचत गटासाठी केंद्र आणि राज्‍य शासनाने अनेक योजना सुरू केल्‍या असून घेतलेल्या कर्जाची परतफेड महिला बचत गट शंभर टक्के करतात. या बचत गटाच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहून सर्व प्रकारची मदत करू. महिला बचत गटांनी उत्‍पादित केलेल्‍या मालाला, वस्‍तूला बाजारपेठ मिळत नाही तोपर्यंत कोणतेही उत्‍पादन करून उपयोग होत नाही. उत्‍पादित मालाला बाजारपेठ मिळणे गरजेचे आहे. त्‍यासाठी निश्चितपणे प्रयत्‍न करू अशी ग्वाही भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी दिली.

         महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र रेणापूर या संस्थेची बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात रेणापूर येथे पार पडली. या निमीत्‍ताने आयोजित महिला मेळाव्‍यात आ. रमेशआप्पा कराड बोलत होते. माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी एम. एस. पटेल, सहाय्यक अधिकारी सुर्यंकांत वाघमारे, भाजपाचे विक्रमकाका शिंदे, माजी सभापती अनिल भिसे, माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, तालुकाध्यक्ष अँड दशरथ सरवदे, संगायो अध्‍यक्ष वसंत करमुडे, बालग्रामचे पिताभास नंदा, मानदेशी फाऊंडेशच्‍या गायत्री वाघमारे, जिल्‍हा उद्योग केंद्राचे पवार, महिला आर्थिक विकास महामंडाळाचे लखाधिकारी परमेश्‍वर इंगळे, प्रशिक्षण संस्‍थेचे सतिष कांबळे, माविमचे व्‍यवस्‍थापक मंगल वाघचौरे, सुजाता तोंडारे, अजित कांकरीया, सरिता पाटील, शरद दरेकर, दत्‍ता सरवदे, उत्‍तम चव्‍हाण, संध्या पवार, संस्थेच्या व्यवस्थापक उषा डुमणे, संस्थेच्या अध्यक्षा सौ सरस्वती पवार, उपाध्‍यक्षा अनुसया फड, सचिव समेरून शेख, कल्‍पना मस्‍के यांची प्रमुख उपस्थिती होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेस व महिला मेळाव्यास तालुक्यातील ३६ गावातून २४८ बचत गटातील अडीच-तीन हजाराहून अधिक महिला उपस्थित होत्या.

       संसाराचा गाडा ओढण्‍याचे मातृ शक्‍तीकडू शिकले पाहीजे. पुर्वी महिलांना स्‍वातंत्र्य नव्‍हते, आज महिला घराबाहेर पडली, गावागावात महिलांनी बचत गटाची स्थापना केली म्हणूनच बाहेरचे जग पाहता आले. अनेक योजनेमुळे प्रगती होवू लागली, बाजार कळू लागला, उद्योग कसे करावेत आणि चालवावेत याची जाणीव महिलांना होवू लागली असे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की प्रत्येक बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी छोटे छोटे उद्योग सुरू करावे. त्यातून निश्चितच आर्थिक आधार मिळू शकतो. बचत गटाच्या माध्यमातून दर्जेदार आणि चांगली उत्पादने निर्माण झाली तर बाजारपेठ उपलब्ध होण्यास अडचणी येणार नाहीत. त्‍यातून प्रत्‍येकाला रोजगारही मिळू शकतो. तेव्‍हा महिलांनी बचत गटाच्‍या माध्‍यमातून आपले अस्‍तीत्‍व निर्माण करावे, सामाजिक बांधिलकी जोपासावी, निश्चितपणे महिला बचत गटाच्‍या उत्‍पादनास बाजारपेठ मिळवून देण्‍याची ग्‍वाही दिली.

         यावेळी जिल्हा समन्वय अधिकारी एम एस पटेल यांनी कार्यक्रमाच्‍या प्रास्ताविकातून महिलांना सविस्‍तर मार्गदर्शन केले. प्रारंभी संस्‍थेच्‍या उपाध्‍यक्षा अनुसया फड यांनी संस्‍थेचे अहवाल वाचन केले. प्रगती महिला बचत गट घनसरगाव, तुळजाभवानी महिला बचत गट हणमंतवाडी यांना १० लाखाचा मंजूर कर्जाचा धनादेश देण्‍यात आला. संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या उत्कृष्ट बचत गट, उत्कृष्ट महिला उद्योजक, उत्कृष्ट सीआरपी, उत्कृष्ट सहयोगीनी, उत्‍कृष्‍ट ग्रामसंघ यांचा आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी शासनाच्या विविध योजना आणि महिला बचत गट कशा पद्धतीने उद्योग व्यवसायात काम करतील याबाबत मौलिक विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहयोगीनी वैजंता हारकळ यांनी केले तर शेवटी तालुका समन्वयक उषा डूमणे यांनी उपस्थित यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्‍या सुरूवातीस आ. रमेशअप्‍पा कराड व इतर उपस्थित मान्‍यवरांनी महिला बचत गटाच्‍या विविध स्‍टॉलला भेट देवून समाधान व्‍यक्‍त केले. संस्थेच्या वतीने सौ सरस्वती पवार, अनुसया फड, समेरून शेख, कल्‍पना मस्‍के सोनम राजपूत, कल्‍पना मस्‍के, प्रतिभा सुर्यवंशी, कविता कांबळे, रिहाना शेख, सावित्री आडे, तस्‍लीम शेख, वर्षा इंगळे, सविता गंगथडे, नाजीया शेख, मिना शिंदे, उर्मीला इरळे, दिक्षा मस्‍के, सुरेखा बनसोडे, महाकन्‍या जाधव, लक्ष्‍मी गायकवाड, मंदाकीनी माने, उमा सोमवंशी यांच्‍यासह अनेकांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्‍कार केला या वार्षिक सर्वसाधारण सभा तथा महिला मेळाव्‍यास अडीच-तीन हजाराहून अधिक महिलांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने