महावितरणच्या निषेधार्थ शेतकर्‍यांनी काढली औसा येथे प्रतिकात्मक प्रेतयात्रा

 महावितरणच्या निषेधार्थ शेतकर्‍यांनी काढली

औसा येथे प्रतिकात्मक प्रेतयात्रा

औसा/प्रतिनिधी -

औसा तालु3यामध्ये

मागील एक महिन्यापासून

महावितरण विभागाच्या

ढिसाळ कारभारामुळे तसेच

शेतकर्‍यांच्या शेती पंपाला

सुरळीत विद्युत पुरवठा करण्यास

अपयश येत असल्यामुळे संतप्त

शेतकर्‍यांनी शुक्रवार दिनांक

25 ऑगस्ट रोजी लातूरवेस

हनुमान मंदिर येथून तहसील

कार्यालयापयरत महावितरणच्या

डीपीची प्रतीकात्मक प्रेतयात्रा

काढून विद्युत वितरण कंपनीचा

निषेध नोंदविला. मागील एक

महिन्यापासून पावसाने दडी

मारल्यामुळे शेतकर्‍यांची खरीप

पिके वाळत आहेत.

त्यामुळे शेतकर्‍यांना

शेती साठी पाणी देण्याकरिता

विद्युत पुरवठा सुरळीत

नसल्यामुळे अनेक अडचणी

येत आहेत. गावोगावी डीपी

जळाल्यानंतर शेतकर्‍यांना

वर्गणी करण्यास भाग पाडत

आहेत. तसेच डीपी मध्ये ऑइल


टाकण्यासाठी शेतकर्‍यांना पैसे

मोजावे लागतात. किटकॅट

बदलणे वायर बदलणे किंवा

इतर किरकोळ दोष निर्माण

झाल्यास लाईनमन व

महावितरण विभागाचे अभियंता

यांचे कसल्याही प्रकारचे

शेतकर्‍यांना सहकार्य मिळत

नसल्याने आर्थिक पिळवणूक

होत असलेला शेतकरी

वर्ग संतापलाआहे. संतप्त

शेतकर्‍यांनी महावितरण चा


निषेध करीत महावितरणच्या

डीपीची प्रतीकात्मक प्रेतयात्रा

काढून तहसील कार्यालया

समोर महावितरण चा निषेध

नोंदविला.

तसेच विद्युत

वितरण कंपनीने तात्काळ या

कामी लक्ष घालून शेतकर्‍यांना

सुरळीत विद्युत पुरवठा

करण्याचे नियोजन करावे. या

मागणीचे निवेदन तहसीलदार

औसा यांना शिष्टमंडळाने सादर


केले. विद्युत वितरण कंपनीचे

अभियंता हे शेतकर्‍यांना विद्युत

पुरवठा सुरळीत करण्यास

असमर्थ ठरत आहेत.

तसेच शेतकर्‍यांना

रात्री अपरात्री कृषी पंपाच्या

माध्यमातून खरीप पिकाला पाणी

देण्यासाठी जावे लागत आहे.

गावोगावी अनेक शेतकर्‍यांना

सर्पदंश झाल्याने शेतकरी वर्गात

भीतीचे वातावरण पसरले असून

औसा मतदार संघाचे आमदार


अभिमन्यू पवार यांनीही या

कामी लक्ष घालावे आणि

विद्युत वितरण कंपनीमार्फत

शेतकर्‍यांची होत असलेली

हेळसांड थांबवावी अशी मागणी

निवेदनाद्वारे केली आहे.

शेतकर्‍यांना 12

तास दिवसा सुरळीत विद्युत

पुरवठा करावा, तसेच मागील

एक महिन्यापासून पाऊस गायब

झाल्यामुळे शेतकर्‍यांना 25

हजार रुपये हे3टरी अनुदान

शासनाने द्यावे, शंभर ट क्के

खरीप पिक विमा तात्काळ

देण्यात यावा या मागण्या

निवेदनाद्वारे करण्यात आले

असून या निवेदनावर शेतकरी

संघटनेचे राजेंद्र मोरे, राजू

कसबे, नारायण नरखेडकर,

भरत पाटील, सौदागर

वगरे, सुमन कांबळे, शितल

तमलवार, सुरेखा आयवळे,

गंगाबाई कांबळे, दैवशाला

शिंदे, पूजा सर्जे,सुरेश सूर्यवंशी,

इत्यादींच्या सह्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने