राजमाता जिजामाता संकुलात ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना

 राजमाता जिजामाता संकुलात ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना


 लातूर,  - येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलातील राजमाता जिजामाता विद्यालय, तुळजाभवानी विद्यालय व संगमेश्‍वर विद्यालयात समन्वयक राजीव मुंढे व प्रा. अश्‍विनी केंद्रे यांच्या हस्ते मंगळवारी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा गजर करीत विघ्नहर्त्या श्री गणरायाचे विधीवत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी संकुलाचे प्रमुख प्राचार्य डी. एन. केंद्रे म्हणाले की, सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी १८९४ साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. टिळकांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी व विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला. विद्येची देवता म्हणून ओळखल्या जाणार्‍या गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख-समृध्दी आणि शांती प्रस्थापित होते, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये व प्राचार्य संगमेश्‍वर केंद्रे यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली. यावेळी संस्थेच्या विधी सल्लागार राणी केंद्रे, मुख्याध्यापक स्वाती केंद्रे, समन्वयक वैशाली केंद्रे, प्राचार्य जी. आर. मुंडे, राजेंद्र जायेभाये, प्रा. कविता केंद्रे, सुनीता जवळे अन्य शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने