आबासाहेब इंग्लिश स्कूल येथील दहीहंडी फुटली

आबासाहेब इंग्लिश स्कूल येथील दहीहंडी फुटली
देवणी/ प्रतिनिधी-तालुक्यातील आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यु. कॉलेज देवणी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणी चे संस्था सचिव गजानन भोपणीकर यांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कै. रसिका महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के, इंग्लिश स्कूलचे प्राचार्य राहुल बालुरे, यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी श्रीकृष्ण आणि राधा यांच्या विविध वेशभूषेत सजलेली बाल गोपाल सहभागी झाले होते.बालगोपालांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यामध्ये श्रीकृष्णाची व राधाची वेशभूषा परिधान करून नृत्य सादर करण्यात आले आणि तसेच बालगोपालांनी कृष्णाच्या "गोविंदा बोलो , हरी गोविंदा बोलो..." या गाण्यावर ठेका धरत मनोरा रचून दहीहंडी फोडली आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले.
जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणी चे संस्था अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर व संस्था सचिव गजानन भोपणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील लीड को ओर्डीनेटर क्षेमानंद कन्नाडे व रणजीत गायकवाड ,वस्तीग्रह अधीक्षक मंजुनाथ कन्नाडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख अनुराधा मोठे, ओ. एस. प्रवीण बिरादार , रामदास नागराळे आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. अशातऱ्हेने शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येऊन जल्लोषात श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी सोहळा साजरा केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने