संतोष सोमवंशी यांनी साजरा केला बैलपोळा

 संतोष सोमवंशी यांनी साजरा केला बैलपोळा
औसा- तालुक्यातील धानोरा येथे श्रावण आमवस्या म्हणजे बैल पोळा सन महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा सहसंपर्कप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांनी मनोभावे पूजा करून उत्साहात साजरा केला.
अन्न धान्य पकविण्यासाठी वर्ष भर आपल्या धन्यासोबत काबाडकष्ट करणार्‍या सर्जा राजा या बैलासह सर्वच पशुधनाला गोड धोड पुरण पोळीचा घास भरवून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सन दुष्काळ आणि लम्पीच्या आजारानचे सावट असतानाही शेतकऱ्यांनी मोठय़ा उत्साहात बैल पोळा सन साजरा केला पशुधनावरील लम्पीच्या आजार दुर व्हावा म्हणून प्रार्थना केली यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा सहसंपर्कप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी, सरपंच सुरेश मुसळे, माजी उपसरपंच बेलपान कास्ते, तंटामुक्त अध्यक्ष सजीव सोमवंशी, बाबासाहेब सोमवंशी, भगवान सोमवंशी, विलास पाटील, विजयकुमार हामने, संजय सोमवंशी, अरविंद कोळपे, बालाजी सोमवंशी, काका सोमवंशी आदी सह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने