तुझ्या रुपाचं चांदणं

 तुझ्या रुपाचं चांदणं



आटपाट नगरीत सहज फेरफटका मारताना
नजरेत कैद झाली ध्यानीमनी नसताना

माझ्या ह्रदयरुपी कॅमे-याने तुझी प्रतिमा टिपली
नकळत माझ्या मनपटलावर लगेच चित्रीत केली

तुझ्या रुपाचं चांदणं थेट ह्रदयाला भिडलं
अंगाअंगात माझ्या प्रिये नवचैतन्य शिरलं

तेव्हापासून माझं तुझ्यावर प्रेम बसलं
स्वप्न माझं फुलणार असं वाटायला लागलं

येशील का तुझ्या घराचा उंबरठा ओलांडून 
देशील का साथ तू मला अर्धांगिनी बनून

तुझ्या एका होकाराने सर्व अंधकार मिटेल
तुझ्या सोबतीने जीवनातील सर्व प्रश्न सुटेल

सुनीलच्या मनातील कल्पना आपण सत्यात उतरवू
आपल्या अनोख्या प्रेमाचा नवा इतिहास घडवू


            शब्दस्पर्शी
   कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने