मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सव उत्साहात साजरा

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सव उत्साहात साजरा 
 मुरूम (प्रतिनिधी) : येथील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त रविवारी (ता. १७) रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस अभिवादन करून ध्वजारोहण मुरूम येथील माजी सैनिक प्रभाकर इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अमृत महोत्सवानिमित्त शहर व परिसरातील माजी सैनिकांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचा मुलीच्या संघाने धाराशिव येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्ल संघातील शुभांगी जाधव, भाग्यश्री शेख, सिमरन मडोळे, सविता बोकडे, सारिका बिराडे, दिपाली कुडकले, श्रुती सावंत, श्रावणी व ५७ किलो वजन गटातील कुस्ती स्पर्धेत महाविद्यालयातील वैभव वाघमोडे हा विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविल्याबद्ल सर्व विजेत्यांचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक बी. आर. इंगोले यांचा सत्कार भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे, सचिव पद्माकरराव हराळकर, संचालक त्र्यंबक इंगोले, रामभाऊ इंगोले, तानाजी फुगटे, प्राचार्य डी. टी. इंगोले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने