प्राचार्य धनाजी राजे यांना प्रशासन रत्ने पुरस्कार

प्राचार्य धनाजी राजे यांना प्रशासन रत्ने पुरस्कार
देवणी : येथील विवेक वर्धनी महाविद्यालयाचे प्राचार्य धनाजी राजे यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्याकडून त्यांना दि. ३ सप्टेंबर रोजी नांदेड येथे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, माजी खासदार शंकर धोंडगे, प्रदीप सोळंके, गिरीश जाधव, विश्वंभर घोपडे, राम एडते, व्यंकटराव जाधव, मुरलीधर गोडबोले, मारुती तुपकर, डॉ. मनीषा तिवारी, प्रा. वैशाली माने, शेषराव माने, विनोदकुमार हिंगेवाड, गोपीनाथ सगर यांच्या उपस्थितीत प्रशासन रत्न हा पुरस्कार देण्यात आला. याबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने