देवणी जातीच्या गाय व वळूचे देवणीवंश संशोधन केंद्र परळीला पळविले !

देवणी जातीच्या गाय व वळूचे देवणीवंश संशोधन केंद्र परळीला पळविले !
देवणी/ प्रतिनिधी-मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकित राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देवणी जातीचे गोवंश संशोधन केंद्र परळी ला पळवून घेऊन गेले  लातूर जिल्ह्यातील सर्व आमदार व कॅबिनेट मंत्री हातावर हात ठेवून बघत राहिले एका शब्दानेही कोणी त्यांना विरोध केला नाही ज्या लोकप्रतिनिधीला देवणीकरांनी मतदान केले त्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल का...?
संपूर्ण देशात अनेक वेळा देवणी जातीच्या लाल कंधारी गायीने व वळूने पहिला क्रमांक पटकावला देवणीकराची शान व मान उंचावली देवणीकारांची अस्मिता व प्रतिष्ठा असलेले   देवणीगोवंश नामशेष होत असताना देवणी जातीची गाय व देवणी जातीचा वळू हा एकमेव ब्रँड असतांना राजकीय शेटलमेंट करून देवणी जातीचे गोवंश संशोधन केंद्र परळीला पळविले गेले.
त्या गोवंश यांच्या नावातच देवणी आहे ही उपजत जातंच देवणी तालुक्यात असतांना यांचे संशोधन केंद्रकोणत्या नियम व अटीवर सर्रास पळविले गेले लातूरचे जिल्ह्यातील विधानसभा व विधानपरिषदेतील राजकीय वळू नंदीच्या भूमिकेत होते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे यापेक्षा देवणीकारांचे दुर्दैव कोणते असू शकत नाही आता देवणीकरानी व गोवंश पालकांनी लोकलढा उभारला पाहिजे कुठल्याही राजकिय पुढाऱ्याला देवणी तालुक्यात पाय ठेऊ देऊ नये हातात रुमन व आसूड  घेऊन राजकिय पुढाऱ्याला सरळ केल्याशिवाय देवणीकराच वैभव असलेलं देवणी जातीच्या लाला कंधारी गाय व वळू हे देवणीवंश संशोधन केंद्र देवणीला मिळणार नाही मिळविण्यासाठी रान उठविण्याची गरज निर्माण झाली आहे 
लातूर जिल्ह्यातील विधानसभा व विधानपरिषद असे सहा सात आमदार आहेत परंतु देवणीचे हित जोपासणारा एकही आमदार नाही राजकारनाचा सध्या चिखल झाला आहे कोणत्याही राजकीय पक्षाला आपली राजकीय ध्येय धोरण उद्दिष्टे राहीलेली नाही एक मेकांची मनधरणी करून स्वार्थ साधण्यात व्यस्त आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सांभाळायचे आहे आमदार संभाजीराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे मौन पाळतात हे शंभर टक्के सत्य आहे त्यामुळे देवणी गोवंश संशोधन केंद्र हे धनंजय मुंडे यांच्याकडे गेले आहे संजय बनसोडे हे तर राज्याचे कॅबिनेट मंत्री असले तरी केवळ उदगीरचेच मंत्री असल्याच्या भूमिकेत असतात धनंजय मुंडे व संजय बनसोडे एकाच विचारधारेच्या पक्षात असल्याने धनंजय मुंडे यांना विरोध करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही हे केवळ शेटलमेंट राजकारण करून देवणीचे वाटोळे केले जात आहे देवणीचा महसूल विभाग पोलीस उपविभाग, महावितरणचा उपविभाग निलंग्याला पाहिलेचं पळवून देवणीकारांची गैरसोय केली आहे आत्ता सध्या देवणीकराच्या अंगावर फक्त कपडेचं बाकी राहिले आहेत तेही ही राजकीय लोकप्रतिनिधी काढून घेऊन देवणी कराना नागड करतील  यात शंका नाही तरी पण देवणी येथील लोकांना राग येत नाही हाच का गुन्हा
 देवणी तालुक्यात भोपणीकर, नागराळकर, तळेगांवकर, मानकरी, विळेगावकर,विजयनगर, अशी बलाढ्य राजकीय घराणे आहेत यांच्या स्थावर मालमत्ता ह्या केवळ देवणी तालुक्यात आहेत यांचे कार्यक्षेत्र दुसऱ्या तालुक्यात आहे केवळ गाव सांगण्यासाठी देवणी तालुका आहे  ही राजकीय घराणे ज्याचे समर्थक आहेत त्यांच्या पक्षाच्या राजकीय लोकप्रतिनिधी कडून देवणी तालुक्याचं शंभर टक्के वाटोळं होत आहेत तालुक्यातील आम्ही करते धरते स्वतःला धारकरी समजणाऱ्या या घराण्यातील पुढाऱ्यांचा पाहिले बंदोबस्त झाला पाहिजे.घरका भेदी लंका ढाल.असेच म्हणावं लागेल यांना ह्या राजकिय लोकांनी शेटलमेंट करून देवणी कराच्या अस्मितेला धक्का दिला आहे आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा या निवडणुकीत तालुक्यातील मतदारांनी देवणी वळूची ताकत दाखविल्याशिवाय राहणार नाहीत हे शंभर टक्के खरे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने