क्रांतीवीरांच्या स्मृती अभ्यास आणि संशोधन केंद्र उभारले जावे-भरत सुर्यवंशी तहसीलदार

क्रांतीवीरांच्या स्मृती अभ्यास आणि संशोधन केंद्र उभारले जावे-भरत सुर्यवंशी तहसीलदार
औसा/प्रतिनिधी: तालुक्यातील देवताळा येथील क्रांतिवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमी येथे मराठवाडा मुक्ती दिन अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना भरत सुर्यवंशी तहसीलदार औसा म्हणाले की,'मराठवाड्यातील सर्व क्रांतिवीरांच्या कार्याचे नवीन पिढीला स्मरण रहावे. यासाठी ज्या त्या परिसरात स्थानिक क्रांतीवीरांच्या स्मृती,अभ्यास आणि संशोधन केंद्र उभारले जावे. त्याची सुरूवात क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांच्या स्मृति, अभ्यास आणि संशोधन केंद्र उभारले जावे.' या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विवेकानंद दत्तोबा भोसले हे होते. 
तर प्रमुख पाहुणे बसवराज मंगरूळे औरंगाबाद, राजेंद्र महाराज देवताळा देवस्थान, एम.डी.चव्हाण, आशा भोसले सरपंच मातोळा,अमरसिंह भोसले उपस्थित होते.कमलाकर सावंत यांनी उपस्थित पंधरा व्याख्यात्यांचे स्वागत केले.लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील एकशे एक गावात जाऊन 'हैद्राबाद मुक्तिसंग्राम व क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांचे योगदान 'या विषयावर व्याख्यान दिल्याबद्दल त्यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.यात सहभागी व्याख्यात्यांनी आपले अनुभव कथन केले.बसवराज मंगरूळे,सुभाष चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.विवेकानंद भोसले यांनी डिफेन्स अकॅडमीच्या वाटचालीचा आढावा घेतला.तानाजी चव्हाण यांनी सुत्रसंचालन केले. शेवटी प्राचार्य दौलतराव घोलकर भानुदासराव चव्हाण महाविद्यालय लोहारा यांनी आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने