केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी माजी आ.कव्हेकरांची राष्ट्रीय महामार्गाबाबत चर्चा

 केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी माजी आ.कव्हेकरांची राष्ट्रीय महामार्गाबाबत चर्चा

लातूर -भाजपा नेते तथा केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री मा.नितीनजी गडकरी यांची दिल्‍ली येथील कार्यालयामध्ये भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी भेट घेऊन मराठवाड्याचा अनुशेषासह लातूर जिल्ह्यातील कव्हा लामजना मार्गे हैद्राबाद जाणार्‍या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गामध्ये समावेश करण्याबाबत चर्चा केली.
नितीनजी गडकरी हे 1989 साली विधानपरिषदेचे आमदार झाले. तब्बल वीस वर्ष ते विधानपरिषदेचे ते सदस्य होते. त्यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पदही भूषविलेले आहे. 2009 ते 2013 या कार्यकाळात त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळलेले आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम केलेले आहे व सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये रस्ते वाहतुक, महामार्ग मंत्री पदावर कार्यरत आहे. त्यामुळे भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मराठवाड्याच्या रखडलेल्या अनुशेषाबाबत सविस्तर चर्चा करून लातूर-कव्हा-लामजना मार्गे हैद्राबाद जाणार्‍या व दोन राज्याला जोडणार्‍या रस्त्याला नॅशनल हायवेमध्ये समाविष्ठ करून हा रस्ता पूर्ण करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी बोलताना केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने