'केशवराज' विद्यालयात श्रीगणेशाची उत्साहात प्रतिष्ठापना

 'केशवराज' विद्यालयात श्रीगणेशाची उत्साहात प्रतिष्ठापना 



लातूर /प्रतिनिधी:येथील श्री केशवराज माजी विद्यार्थी संघ व श्री केशवराज माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. १९) श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीगणेशाची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. 
     लेझीम पथकाच्या मिरवणुकीतून 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात श्रीगणेशाचे आगमन विद्यालयात झाले.संस्था केंद्रीय कार्यकारिणी सदस्य संजय गुरव,स्थानिक समन्वय समिती कार्यवाह शैलेश कुलकर्णी,शालेय समिती अध्यक्ष गंगाधर खेडकर,माजी मुख्याध्यापक उमेश सेलुकर,केशवराज माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष प्रदीप राऊत, मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, उपमुख्याध्यापक तथा विद्यासभा संयोजक महेश कस्तुरे,पर्यवेक्षक संदीप देशमुख,दिलीप चव्हाण, बबन गायकवाड, पर्यवेक्षिका श्रीमती अंजली निर्मळे यांच्या उपस्थितीत गणेशाची पूजा व आरती करण्यात आली.
      यावेळी लेझीम पथकातील आकर्षक वेशभूषेमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधले.याप्रसंगी सर्व मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
      या कार्यक्रमासाठी गणेशोत्सव प्रमुख तथा अभ्यासपूरक मंडळ प्रमुख  श्रीमती शैला सांगवीकर,सहप्रमुख धनंजय कुलकर्णी,संस्कार मंडळ प्रमुख श्रीमती जान्हवी देशमुख,श्रीमती संगीता लोखंडे,क्रीडा शिक्षक गुरूनाथ झुंजारे,प्रयागराज गरूड यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने