श्री योगेश्वरी देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

श्री योगेश्वरी देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
देवणी /प्रतिनिधी-क्रीडा व युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर, द्वारा आयोजित देवणी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गौडगाव वार मंगळवार रोजी मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देवणीचे गट शिक्षण अधिकारी श्री सिंदलकर साहेब व प्राचार्य श्री उमेश पाटील सर, तालुका क्रीडा समन्वय धनाजी पाटील सर यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. तालुक्यातील विविध शाळांचे क्रीडा शिक्षक व १४ वर्ष ,१७ वर्ष,१९ वर्ष वयोगटातील विद्यार्थी (मुली) उपस्थित होते.या वेळी १४ वर्ष वयोगटातून श्री योगेश्वरी देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवणी प्रथम आली आहे.सर्व सामने खूपच रोमहर्षक झाले. विद्यार्थिनींनी यांचा आनंद घेतला. विजयी सर्व कबड्डी संघाचे विद्यार्थिनींचे व क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.तालुकास्तरीय कबड्डी क्रिडा स्पर्धेमध्ये श्री योगेश्वरी देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवणी या शाळेतील १४ वर्ष वयोगटातून मुलींचा संघ तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला असून यांची जिल्हा स्तरावर निवड झाली.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव श्री यशवंतराव पाटील,सह सचिव श्री अभिजीत पाटील, कोषाध्यक्ष श्री आदित्य पाटील, शाळेचे प्राचार्य हरकंचे आर.एम. यांनी व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक श्री घोणसे ए.बी.यांचे सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने