कै.रसिका महाविद्यालयास टेबल टेनिस स्पर्धेत यश

कै.रसिका महाविद्यालयास टेबल टेनिस स्पर्धेत यश
 शिरूर ताजबंद प्रतिनिधी -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शिरूर ताजबंद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेत कै. रसिका महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. या संघात मुराळे सुनील, मुराळे अनिल ,आकाश बिरादार ,मंगेश धोत्रे ,बागवान ताहेर यांचा समावेश होता. या खेळाडूना क्रीडा संचालक डॉ. सचिन चामले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल संस्थाध्यक्ष गोविंदराव भोपणीकर, संस्थासचिव गजानन भोपणीकर , प्राचार्य डॉ चंद्रकांत जावळे, उपप्राचार्य डॉ शिवाजी सोनटक्के, यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم