‌'पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन'

‌'पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन' 

      लातूर /प्रतिनिधी -शब्दांकित साहित्य मंच, लातूर व जयक्रांती वरिष्ठ महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
 'मियाँजानची कोंबडी आणि इतर कथा'-रत्नकुमार सांभरिया, अनुवाद- शीला बरडे-रणसुभे या अनुवादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
२७ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता, सभागृह, जयक्रांती महाविद्यालय लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या 
अध्यक्षस्थानी 
डॉ. नागनाथ कुंटे, (प्रसिद्ध हिंदी लेखक तथा विचारवंत) हे आहेत. तर 
भाष्यकार म्हणून 
प्रा. डॉ. राजशेखर सोलापुरे,(प्रसिद्ध व्याख्याते, विचारवंत) व 
मा.प्रा.डॉ. सुशिला पिंपळे, (अभ्यासक, वक्ता) लाभले आहेत. प्रमुख उपस्थितीत मा. शीला रणसुभे,अनुवादक, मा.प्रो.डॉ.श्रीधर कोल्हे, (प्राचार्य, जयक्रांती वरिष्ठ महाविद्यालय, लातूर) हे आहेत. तरी या प्रकाशन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन शब्दांकित साहित्य मंचच्या संस्थापक अध्यक्ष प्रा. नयन भादुले- राजमाने मॅडम, अध्यक्ष मा.विजया भणगे मॅडम, सचीव मा.उषा भोसले मॅडम, कोषाध्यक्ष प्रा.डॉ. क्रांती मोरे मॅडम तसेच जयक्रांती महाविद्यालयाचे प्रा.केशव अलगुले सर, प्रा.दिलीप गुंजरगे सर, प्रा.कोथमे सर, प्रा.पवार सर व शब्दांकित साहित्य मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم