महावितरणची प्रेतयात्रा निराधार संघर्ष समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काढली

महावितरणची प्रेतयात्रा निराधार संघर्ष समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काढली 
औसा/प्रतिनिधी -निराधार संघर्ष समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महावितरण च्या निषेधार्थ औसा येथील वीर हनुमान मंदिरापासून ते तहसिल कार्यालयापर्यंत महावितरण ची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून औसा तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करीत तिरडी जाळून केला निषेध व औसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी या आंदोलनात विज वितरण कंपनीने स्वतःच्या निधीतून जळलेले डीपी व लागणा-या साहित्यासाठी खर्च करून तात्काळ वीजपुरवठा सुरू करून दिवसाची किमान 12 तास वीज देऊन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी.हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावी,100 टक्के पिकविमा द्यावे, दुष्काळ जाहीर करावा,या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर कसलाही आवाज न उठवता फुकटच्या प्रसिद्धीमध्ये लागलेल्या औश्याच्या अकार्यक्षम नाकर्त्या लोकप्रिय आमदाराच्या निषेधार्थ वीजवितरण कंपनीची प्रेतयात्रा काढून 25 ऑगस्ट शुक्रवार रोजी निराधार संघर्ष समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने औसा तहसीलदार यांना या विविध मागणीचे निवेदन दिले. यावेळी या आंदोलनात राजेंद्र मोरे, राजीव कसबे, नारायण आबा नरखेडकर,भरत पाटील, दगडु बरडे, शेषेराव गायकवाड, सौदागर वगरे,बिसेनदादा, हरिभाऊ कुलकर्णी, कृष्ण माने, सुमनबाई कांबळे,शितल तामलवार,सुरेखा आयवळे, गंगाबाई कांबळे,दैवशाला शिंदे,पुजा सर्जे,लोचनताई,
सुरेश सुर्यवंशी,कवठे भैय्या,बलभीम पवार, केसरकर, साहेबराव जगताप,गौतम कांबळे,सुभाष काळे, पार्वती शिंदे, रमेश तेलंग, मुस्तफा देशमुख आदि या आंदोलनात सहभागी झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने