भाषा माणसाला जोडण्याचे काम करते - डॉ. संतोष कुलकर्णी

 भाषा माणसाला जोडण्याचे काम करते - डॉ. संतोष कुलकर्णी

बाभळगाव : " हिंदी दिवस राष्ट्रीय पातळीवर सन्मानाने साजरा केला जातो. हिंदी ही प्रत्येक भारतीयांची प्रेमभाषा आहे. हजारो वर्षापासून हिंदीने समाजमूल्य सांभाळत राष्ट्रीय पातळीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. हिंदी ही रोजगाराची भाषा म्हणून आज पुढे येत आहे. मानवाच्या एकूण विकासामध्ये भाषेला अनन्य साधारण महत्त्व आहे. भाषा ही माणसाला जोडण्याचे काम करते" - असे प्रतिपादन सरस्वती संगीत कला महाविद्यालय, लातूर येथील हिंदी विभाग प्रमुख डॉ. संतोष कुलकर्णी यांनी केले.
             दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बाभळगाव द्वारा संचलित कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव येथे हिंदी दिवसाच्या निमित्ताने डॉ. संतोष कुलकर्णी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे होते.  यावेळी बोलताना ते म्हणाले," हिंदी ही भारतामधील सर्वात जास्त बोलली जाणारी लोकभाषा आहे. हिंदी या राजभाषेमुळेच आपण एका सूत्रामध्ये बांधली गेलो आहोत. हिंदी ही राष्ट्रीय स्तरावरील गौरव भाषा आहे."
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. रणजीत जाधव यांनी केले.  यावेळी कु.लोंढे वैष्णवी आणि कु. सुरवसे धरती यांनी हिंदी भाषेवर गौरवपर आपली मनोगत व्यक्त केली.  सूत्रसंचालन शेंडगे प्रणिता हिने तर आभार डॉ. मा.ना. गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने