राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक मध्ये शिक्षक दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक मध्ये शिक्षक दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
औसा /प्रतिनिधी-  श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्निक हासेगाव येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला तसेच वक्तृत्व स्पर्धेतील स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.
    यावेळी मंचावर वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे , प्राचार्य संतोष मेदगे, उद्योजक श्रीनिवास मेनकुदळे, प्रा सतीशकुमार गायकवाड उपस्थित होते.
    सर्वप्रथम डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात सर्व प्राध्यापकांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून करण्यात आली,          
       तंत्रनिकेतनामध्ये शिक्षक दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात पठाण महेक, बिजापुरे अमिना, दिव्या हेळंमकर, मुंजाळे निकिता, कांबळे श्वेता, पठाण अरशिया, रणखांब पल्लवी , जाधव ऋतुजा, काळे श्रुती यांनी सहभाग नोंदविला होता. त्यांचाही सत्कार करण्यात आला.
 त्यानंतर संस्थेचे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे यांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनातील शिक्षकांच्या शिकवणीमुळे तो पुढील जीवनात यशस्वी होतो, राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे मोठे योगदान आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तित्व खुलून दिसण्यासाठी त्यांनी महाविद्यालयीन विविध कार्यक्रम व स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. तर प्राचार्य संतोष मेदगे यांनी डॉ राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून विद्यार्थी प्रेरीत शिक्षण प्रणालीत कृतीयुक्त शिक्षणाचा जास्तीत जास्त वापर करावा, आपल्या शिक्षकांवर श्रद्धा ठेवून त्यांच्याकडून अधिकाधिक ज्ञान ग्रहण करावे असे प्रतिपादन केले.
सुत्रसंचालन काटकर आसिफ यांनी केले, यावेळी प्रा पाटील डी पी प्रा पंचाक्षरी एस एम प्रा कल्याणकर एस ए प्रा ताडके के डी प्रा पठाण एस ए प्रा सांगवे आर एस प्रा राजपुत एच बी पाटील ए आर शिंदे ए व्ही माने एस एस ग्रंथपाल मनदीप सवाई व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने