किल्लारी भूकंपात बळी पडलेल्यांच्या स्मृतीला विधान परिषद उपसभापती गोऱ्हे यांनी वाहिली श्रद्धांजली

किल्लारी भूकंपात बळी पडलेल्यांच्या स्मृतीला विधान परिषद उपसभापती  गोऱ्हे यांनी वाहिली श्रद्धांजली
आ.अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनीही वाहिली श्रद्धांजली

लातूर - लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात 30 सप्टेंबर 1993 ला झालेल्या भूकंपात हजारो लोकं मरण पावले. त्या दुःखद घटनेला आज तीस वर्ष पूर्ण झाले, त्यासर्वांप्रती संवेदना व्यक्त करून विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी किल्लारी येथील स्मृती स्तंभाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.

 यावेळी आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्यासह अधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

फुलपाखरू उद्यानाचे लोकार्पण
ज्या ठिकाणी भूकंप झाला ते निर्मनुष्य किल्लारी गाव वन विभागाकडे दिले आहे.वन विभागाने तिथे पूर्वीच नक्षत्र उद्यान उभं केलं आहे. आज उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. हे फुलपाखरू उद्यान एक एकर एवढ्या क्षेत्रावर करण्यात आले आहे. या लोकार्पणावेळी आ. अभिमन्यू पवार, वन विभागाच्या उपविभागीय वन अधिकारी श्रीमती तांबे, औसा तहसीलदार भारत सूर्यवंशी, सहायक वन अधिकारी सचिन रामपुरे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने