नव्या युगाच्या गरजा लक्षात घेऊन विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचा अद्यावत सुविधांसह विस्तार केला जाईल - ऍड किरण जाधव
विलास को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिमंळाची वार्षिक सभा खेळीमेळीत
लातूर : प्रतिनिधी
विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेणेतून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी २२ वर्षांपूर्वी विलास को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली. सर्व सामान्यांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या बँकेने सर्वसामान्यांची आर्थिक पत वाढवली, असे प्रतिपादन माजी आमदार वैजनाथराव शिंदे यांनी केले.
विलास को-आॅपरेटिव्ह बँकेच्या अधिमंडळाची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २४ सप्टेंबर रोजी बँकेचे चेअरमन अॅड. किरण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती चौकातील स्वानंद बॅक्वेट हॉलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात झाली. त्याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून माजी आमदार वैजनाथराव शिंदे बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितभाई शहा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील पडिले, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक संभाजी सुळ यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या दूरदृष्टीतून उभी राहिलेली लातूर जिल्ह्यातील सहकार चळवळ आज नव्या पिढीकडून जपली जात आहे त्यामुळे ग्रामीण जीवनात बदल घडवण्याचे त्यांचे स्वप्न साकार होत आहे असेही यावेळी बोलताना माजी आमदार शिंदे आणि म्हटले.
प्रारंभी बँकेचे अध्यक्ष ऍड किरण जाधव यांनी बँकेच्या स्थापने मागची पार्श्वभूमी विशद करून अद्यावत सोयीसुविधांच्या माध्यमातून विलास को-ऑपरेटिव बँकेचा विस्तार वाढवला जाईल, सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना यशस्वी उद्योजक व्यावसायिक बनवण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पुढे बोलताना ऍड जाधव म्हणाले की विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्यात सहकार चळवळ सक्षमपणे उभी केली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आणि लातूर ग्रामीणचे आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख सहकार चळवळ पुढे घेवून जात आहेत, अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी विलास सहकारी साखर कारखान्याची उभारणी केल्यानंतर माजी मंत्री आमदार अमित विलास को-आॅपरेटिव्ह बँकेची त्याने स्थापना केली. आज घडीला बँकेच्या ठेवी 200 कोटी पेक्षा अधिक असून सहा शाखेच्या माध्यमातून या बँकेचा कारभार चालतो आहे.
बँकेच्या ठेवी वाढाव्यात आणि त्याच प्रमाणात होतकरू तरुणांना अर्थसाह्य करून त्यांना त्यांच्या पायावर उभा करावे असा संकल्प आदरणीय अमित देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने केलेला आहे असेही त्यांनी म्हटले. आजवर या बँकेच्या माध्यमातून बँकेच्या अनेकांचे संसार उभे राहिले आहेत असे नमूद करून नव्या युगाचा विचार करता बॅकेने आज पासून डिजिटल बँक, आॅन लाईन बँकींगची सेवा उपलब्ध करुन दिली आहे असे त्यांनी सांगितले . बँकेचा अहवाल सादर करताना अध्यक्ष ॲड किरण जाधव यांनी की बँकेचे भाग भांडवल राखीव व इतर निधी, ठेवी, ठेवीवरील विमा, कर्जे, दुर्बल घटकांना दिलेली कर्जे, गुंतवणुक, कर्ज वसुली, एन. पी. ए. आॅडीट वर्ग, वैधानिक लेखा विभाग, सीआरएआर, तरतूदी, रोख व तरती जिंदगी, बँकेचे कार्यक्षेत्र सीबीएस कार्यप्रणाली आदींबाबत सविस्तर माहिती दिली.
*चौकट*
*विलास को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ*
विलास को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून आज मान्यवरांच्या हस्ते मोबाईल बँकिंग सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. लवकरच आयएमपीएस , फोन पे गुगल पे यासारख्या सुविधांचीही सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष ॲड किरण जाधव यांनी याप्रसंगी दिली.
.
यावेळी बोलताना ललितभाई शहा म्हणाले, माजी मंत्री विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विलास को-आॅपरेटिव्ह बँकेची वाटचाल सामान्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करणारी ठरत आहे. बँकेने स्वत:ची इमारत उभारण्याचा संकल्प केला आहे. हे सहज शक्य नसते. त्यासाठी आर्थिक शिस्त महत्वाची असते. ती शिस्त विलास को-आॅपरेटिव्ह बॅकेत असल्याचे ते म्हणाले. प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सपाटे यांनी सभेच्या कामकाजाला सुरुवात करुन सभेपूढील विषयाचे वाचन केले. या सर्व विषयांना मल्लिकार्जून वाघमारे यांनी अनुमोदन दिले. सभागृहाने टाळ्यांच्या गजरात विषयांना मंजूरी दिली. यावेळी अहवाल सालातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बँकेचे उत्कृष्ट कर्मचारी म्हणून राजू पुंड यांचा तर सहकार व्यवस्थापन परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या बँकेच्या कर्मचारी महादेवी ठाकुर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सभेस उपस्थित पाहूण्यांचा सत्कार बँकेचे चेअरमन अॅड. किरण जाधव, व्हाईस चेअरमन अॅड. समद पटेल, संचालक व्यंकटेश पुरी, चंद्रकांत धायगुडे, संजय निलेगांवकर यांनी केले. सभेस बँकेचे संचालक अरुण कामदार, डॉ. कल्याण बरमदे,अजय शहा,रमेश थोरमोटे, पंडित कावळे, सलीम उस्ताद, प्रा. डॉ. स्मिता खानापूरे, प्रा. डॉ. जयदेवी कोळगे, अॅड. राजेेंद्र काळे, सीए ऋषिकेश पाटील,सीए संदीप नवटक्के यांच्यासह विजयकुमार साबदे, विजयकुमार धुमाळ, सिकंदर पटेल, आसिफ बागवान, सुंदर पाटील कव्हेकर, प्रा. प्रविण कांबळे तसेच बँकेचे सभासद, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. सुत्रसंचालन राहूल इंगळे-पाटील यांनी केले तर बँकेचे व्हाईस चेअरमन अॅड. समद पटेल यांनी आभार मानले.
إرسال تعليق