तिर्रट खेळणा-या आठ जणांनावर गुन्हा दाखल


तिर्रट खेळणा-या आठ जणांनावर गुन्हा दाखल

देवणी: येथील जय सेवालाल तांडा येथे शुक्रवारी ता.२२ रोजी रात्री नऊ वाजता पत्र्याच्या शेड समोर उघड्या जाग्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर धाड टाकत देवणी पोलिसांनी जुगाराच्या सामानासह १६ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शुक्रवारी रात्री देवणी पासून ३किमी अंतरावर जयसेवालाल या तांड्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपणीय माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद कत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकण्यात आली असता एका पत्र्याच्या शेडसमोर संशयीत आरोपी पिंटू उर्फ सुनिल बापू राठोड वय (३०), अंकुश उध्दव आडे वय(३२)  ,लक्ष्मण उध्दव आडे वय(३५) तिघेही रा.नेकनाळ ता.देवणी, शिवाजी रतन राठोड वय(५२),रा.विद्यानगर ,देवणी, उत्तम शिवाजी चव्हाण वय(३५), परशुराम बालाजी चव्हाण वय(३२) दोघेही रा.कौळखेड ता.उदगीर, नारायण रामधन राठोड वय (४०) रा.सेवालाल नगर तांडा, लक्ष्मण मोतीराम चव्हाण वय(३४) रा.इंदिरा नगर, देवणी या आठ जणांना ताब्यात घेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद कत्ते यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बीट अंमलदार नरेश उस्तुर्गे करित आहेत.

Post a Comment

أحدث أقدم