श्री केशव शिशुवाटिकेत बैलपोळा साजरा

 श्री केशव शिशुवाटिकेत बैलपोळा साजरा 



   लातूर/प्रतिनिधी:येथील श्री केशव शिशुवाटिकेत बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त बालकांना कृषी संस्कृतीची ओळख करून देण्यात आली.
   शेतीमध्ये बैलांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.शेती,बैल,बैलगाडी, झोपडी,खेड्यातील घरे, विहीर,बुजगावणे,गोठा, ट्रॅक्टर,फळे,धान्य आदींची ओळख करून देण्यासाठी छोटेखानी देखावाही उभारण्यात आला.यावेळी उदय गटातील मुलांनी शेतकरी गीते सादर केली. बैलपोळ्या निमित्त विद्यार्थ्यांची माती पासून बैल बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली.
   मुख्याध्यापिका मंजुषा जोशी,कार्यक्रम प्रमुख सौ. राजकन्या जाधव व सहप्रमुख सौ.शोभाताई नाईक यांच्या मार्गदर्शनात शिक्षिका व सेवकांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम पार पडला.विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने